Homeलातूरसंस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा

संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा

लातूर : प्रतिनिधी

विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या शिक्षण प्रक्रियेतील त्रिसूत्री आहेत. आजची पिढी सुशिक्षित करण्याकडे आपला भर असून संस्काराकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वर्तमान स्थितीत विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनता आणि गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. पूर्वीची पिढी आई-वडिलांसाठी प्राण द्यायला तयार होत होती, परंतु आजची पिढी त्यांच्यासुध्दा प्राणावर उठली आहे. विनयशीलता, श्रद्धाभाव आणि संवेदनशीलता या बाबींचा मोठा अभाव जाणवतो आहे. त्यामुळे शिक्षणाबरोबरच शिक्षकांसोबत पालकांनी संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी पुढाकार घेणे नितांत गरजेचे आहे, असे प्रतिपादन साहित्यिक तथा इतिहास अभ्यासक डॉ. विवेक सौताडेकर यांनी व्यक्त केले.

लातूर येथील श्री शैक्षणिक संकुलात पालक मेळाव्या करण्यात आले होते. या पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. दिलीप गुंजरगे हे होते याप्रसंगी मंचावर संस्था अध्यक्ष सरस्वती शिंदे, श्री विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनीषा शिंदे गुंजरगे, संस्था संचालक सौ.मोहिनी चौधरी, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक घाडगे, प्राचार्य मनोज कुलकर्णी,प्राचार्य माने, प्रा.खंदारे, मोहिते आदींची उपस्थिती होती.

याप्रसंगी विविध स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. अध्यक्षीय समारोपात डॉ. गुंजरगे म्हणाले की, शाळा आणि पालक हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करताना दिसून यावेत. पालकांनी आपला पाल्य कमीत कमी मोबाइलचा उपयोग करेल याकडे लक्ष दिले पाहिजे. सध्या मुले वाचन व स्वयंअध्ययन विसरले आहे. हे घटक मुलांमध्ये निर्माण करण्यासाठी पालक व शाळेने प्रयत्न केले पाहिजेत असे नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका मनीषा शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन विशाल गायकवाड तर आभार किरण जगताप यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR