सरसकट कर्जमुक्तीसाठी शेतक-यांचा एल्गार

मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेविरोधात आणि संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणीसाठी आज मुंबईत मंत्रालयाबाहेर एक अत्यंत थरारक आणि अंगावर काटा आणणारे आंदोलन पाहायला मिळाले. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखालील आंदोलकांनी मंत्रालयाबाहेर जोरदार ठिय्या आंदोलन केले.

राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही केवळ अटी-शर्तींची असून ती संपूर्णपणे फसवी आहे, असा आरोप करत रविकांत तुपकर यांच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी आज मंत्रालयावर धडक दिली. राज्यातील शेतक-यांना कोणत्याही अटींशिवाय विनाअट पूर्ण कर्जमुक्ती मिळाली पाहिजे, अशी प्रमुख मागणी घेऊन हे आंदोलन सुरू झाले होते. आंदोलन तीव्र होताच मंत्रालयाबाहेर तैनात असलेल्या मोठ्या पोलिस बंदोबस्ताने रविकांत तुपकर आणि त्यांच्या सहका-यांना बळाचा वापर करून ताब्यात घेण्यास सुरुवात केली.

गळ्यात दोरी अडकवून झाडावर चढले शेतकरीपुत्र
एकीकडे पोलिस तुपकरांना गाडीत टाकत असतानाच, दुसरीकडे आंदोलक अधिकच आक्रमक झाले. काही आंदोलक शेजारील एका मोठ्या झाडावर चढले. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे या आंदोलकांनी आपल्यासोबत दो-या आणल्या होत्या. झाडाच्या फांदीला दोरी बांधून ती थेट स्वत:च्या गळ्यात अडकवून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.

सरकारने तात्काळ विनाअट कर्जमुक्तीची घोषणा करावी, अन्यथा आम्ही याच झाडावर गळफास घेऊन आमचे आयुष्य संपवू, असा आर्त टाहो आंदोलकांनी झाडावरून फोडला.

पोलिस यंत्रणेची उडाली धांदल
व्हीडीओ व्हायरल
मंत्रालयासारख्या व्हीआयपी परिसरात भरदिवसा गळ्यात फास लावून तरुण झाडावर चढल्याने मुंबई पोलिसांची आणि प्रशासनाची प्रचंड धांदल उडाली. आंदोलकांना खाली उतरवण्यासाठी अग्निशमन दल आणि पोलिसांकडून मनधरणी सुरू करण्यात आली. या संपूर्ण घटनेचा थरार कार आणि रस्त्यावरून जाणा-या नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमे-यात कैद केला आहे. गळ्यात दोरी घालून घोषणाबाजी करणा-या शेतकरी पुत्रांचा हा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर वा-यासारखा व्हायरल होत असून, शेतक-यांच्या या उद्विग्नतेमुळे सरकारवर तीव्र टीका होत आहे.

शेतक-यांच्या सातबाराच्या प्रती विधान भवनाच्या दिशेने फेकल्या
विधान भवन परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात असतानाही तुपकर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले. काही क्षणांतच त्यांनी शेतक-यांच्या सातबाराच्या प्रती विधान भवनाच्या दिशेने फेकल्या. त्याचबरोबर सोयाबीन आणि कापूस उधळून शेतक-यांच्या घामाची किंमत द्या, सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती द्या, ‘सरकारने दिलेला शब्द पाळा’ अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

या आंदोलनामागे गेल्या महिन्यातील अन्नत्याग आंदोलनाची पार्श्वभूमी आहे. १५ जून ते १९ जूनदरम्यान बुलडाण्यातील निवासस्थानासमोर रविकांत तुपकर यांनी सरसकट कर्जमुक्तीसह विविध शेतकरी मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन केले होते. आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अनेक ठिकाणी रास्ता रोको, जाळपोळ, आत्मदहनाचे प्रयत्न आणि संतप्त आंदोलनांनी सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये कलावंतांचा अनोखा संघर्ष; सूर आणि तालातून न्यायाची हाक
03:09
Video thumbnail
Big Breaking : पिस्तुल्या महाराजाच्या दीड कोटींच्या बंगल्यावर जप्तीची तयारी!
02:12
Video thumbnail
Latur Protest|सोनम वांगचूक प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद; गांधी चौकात घोषणाबाजी
06:07
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38
Video thumbnail
Big Breaking : नीट पेपरफुटी प्रकरणात CBI पुन्हा लातुरात; तपासाला वेग!
03:15
Video thumbnail
Latur|पावसासाठी वडवळ नागनाथमध्ये शेकडोंचे नवनाथ पारायण
05:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
02:56
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18

Latest news