लखनौ : लखनौ सुपर जायट्ंस आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएलचा आज एकाना स्टेडियमवर सामना रंगला. या सामन्याची नाणेफेक लखनौने जिंकली आणि प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने १५५ धावा केल्या. याउलट लखनौनेही १५५ धावा केल्या आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये लखनौने २ विकेट गमावून फक्त एक धावा केली. सुनील नारायणने २ विकेट काढल्या. सुपर ओव्हरमध्ये रिंकू सिंगने पहिल्याच चेंडूवर ४ धावा केल्या आणि सामना केकेआरने जिंकला.
आयपीएलचा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला आणि त्याचा निकाल सुपर ओव्हरने लागला. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने २० षटकांत ७ गडी गमावून १५५ धावा केल्या. रिंकू सिंगने ५१ चेंडूंमध्ये ८३ धावा करून शानदार अर्धशतक झळकावले आणि तो नाबाद राहिला. रिंकू सिंगने आजच्या सामन्यात ५ झेल घेऊन सामन्यात फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर लखनौच्या संघानेही निर्धारित षटकांत १५५ धावा केल्या. त्यामुळे सुपर ओव्हरचा सामना झाला आणि यात पहिल्याच चेंडूवर कोलकाता नाईट रायडर्सचा विजय झाला.

