३ टप्प्यात हेल्मेटसक्ती लागू होणार

लातूर : प्रतिनिधी
दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या, वाढती वाहतूक आणि वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे रस्ते अपघातांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत आहे. विशेषत: दुचाकी अपघातांमध्ये हेल्मेटचा वापर न करणा-या वाहनचालकांना गंभीर दुखापत होऊन जीव गमावण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे हेल्मेट हा केवळ वाहतूक नियम नसून जीवन वाचविणारे सुरक्षा कवच आहे, हे लक्षात घेऊन लातूर जिल्ह्यात १ सप्टेंबर पासून दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट वापर अनिवार्य करण्यात येत आहे. या निर्णयाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
विना हेल्मेट गाडी चालवल्यास मोटार वाहन कायदा कलम १२९/१९४(डी) नुसार कार्यवाही केली जाणार आहे. त्यासाठी १ हजार रूपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तयामुळे १ सप्टेंबर पासून  दुचाकीवर विना हेल्मेट प्रवास करणा-या वाहन चालकांना दंडास सामोरे जावे लागणार आहे. अशाप्रकारे संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये हेल्मेट वापराची सुरक्षित संस्कृती निर्माण करण्याचा लातूर पोलिसांचा प्रयत्न असणार आहे.
पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग
जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून प्रथम राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग तसेच जिल्ह्यातील प्रमुख वाहतूक मार्गांवर हेल्मेट वापराच्या नियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या मार्गांवर मोठ्या प्रमाणावर दुचाकी वाहतूक होत असल्याने अपघाताचा धोका लक्षात घेऊन सुरुवातीला या मार्गांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
तिस-या टप्प्यात लातूर शहरातील महत्त्वाच्या वाहतूक मार्गावर
जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य मार्ग, ग्रामीण मार्गाच्यानंतर महानगरपालिकेतील प्रमुख रस्ते व शहरातील महत्त्वाच्या मार्गावर हेल्मेट अंमलबजावणी संबंधाने विशेष लक्ष देऊन कार्यवाही करण्यात येणार आहेत. एकंदर सर्व जिल्ह्यातील नागरिक हे नियमितपणे जोपर्यंत हेल्मेट वापरणार नाहीत तोपर्यंत हेल्मेट संबंधाने दंडात्मक कार्यवाही ही सुरूच राहणार आहे.
दुस-या टप्प्यात जिल्हा अंतर्गत सर्व ग्रामीण मार्ग
पहिल्या टप्प्यानंतर लातूर जिल्हा अंतर्गत सर्व ग्रामीण मार्गावर सदर मोहिम राबविली जाणार आहे. या मार्गावर प्रामुख्याने दुचाकीवर वाहतूक करणा-या लोकांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आलेले आहे. अपघाताचे प्रमाण सुद्धा जास्त असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे या सुद्धा मार्गावर प्रवास करणा-या सर्वांनी हेल्मेट वापरणे अनिवार्य  असल्यामुळे हेल्मेट वापरा संबंधाने याही मार्गावर कारवाया करण्यात येणार आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
22:40
Video thumbnail
Dharashiv|उमरग्यात मराठा आंदोलकांचा उद्रेक! तहसीलदारांची खुर्ची पेटवली; 4 जण ताब्यात
02:51
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये पावसाने ओढ दिली! कोरडा दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रवादीची मोठी मागणी
02:05
Video thumbnail
Latur|लातूरच्या सदानंद विद्यालयात ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा आरोप!
05:05
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये नाभिक समाजाचा गौरव सोहळा; जिल्हाभरातून समाजबांधवांची उपस्थिती
02:27
Video thumbnail
Latur|‘तुम से ना हो पायेगा’! अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल; लातूरमध्ये शिवसेनेचं आंदोलन
07:57
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्याने मराठा आंदोलक संतप्त; हदगावमध्ये बॅनर फाडले
00:33
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्यानंतर आंदोलनाची धार वाढली? बरडशेवाळ्यात मराठा समाजाचा रास्ता रोको
00:33
Video thumbnail
Nanded|उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवला! पावसाअभावी नांदेडच्या शेतकऱ्याची हतबलता
02:06
Video thumbnail
Nanded|मराठवाड्याचा मुक्ती संग्राम पाठ्यपुस्तकात घ्या! नांदेडमधून शासनाकडे मोठी मागणी
03:26
Video thumbnail
Latur|हातातोंडाशी आलेला घास गेला! लातूरमध्ये पाण्याअभावी उभी पिकं करपली
03:42
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
07:57
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
10:46
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
19:02
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
16:29

Latest news