31.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूरअक्षय्य तृतीयाला सोने खरेदीला ग्राहकांची पसंती

अक्षय्य तृतीयाला सोने खरेदीला ग्राहकांची पसंती

लातूर : प्रतिनिधी
साडेतीन मुहुर्ता पैकी एक असलेल्या अक्षय्या तृतीयाच्या सणाच्या मुहुर्तावर नागरीकांचा घर, वाहने, सोन्याची दागीने खरेदीसाठी लातूरच्या बाजारपेठेत उत्साह दिसून आला. सोन्याच्या दरात काहीसी वाढ झाली असली तरी सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने नागरीकांनी अक्षय्या तृतीयाच्या सणाच्या मुहुर्तावर सोन्याची दागीने खरेदीला अधिक पसंती दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामुळे लातूरच्या बाजारपेठेत कोटयावधी रूपयांची उलाढाल झाली.
भारतीय कोणताही सण म्हटले की नागरीकांची खरेदीला अधिक पसंती असते. शुक्रवारी अक्षय्या तृतीया सणाच्या दिवशी सोन्याच्या दरात झालेली ५०० रूपयांची वाढ झाली. २४ कॅरेट सोन्याचा दर ७३ हजार ७०० रूपये होता. असे असतानाही सध्या लग्न सराईचा कालावधी असल्याने अक्षय्या तृतीयाच्या सणाच्या मुहुर्तावर नागरीकांनी विविध प्रकारचे सोन्याचे दागीने खरेदीसाठी प्राधान्य दिले.  नागरीकांनी अक्षय्या तृतीयाच्या मुहुर्तावर मंगळसुत्र, सोन्याचा हार, बांगडया, अंगठया आदी दागीने खरेदीसाठी पसंती दिली. तसेच अनेक नागरीकांनी दुचाकी, तीन चाकी, चारचाकी वाहने खरेदीसाठी शोरूमध्ये गर्दी दिसून आली. वाहन उद्योगाच्या बरोबरच नागरीकांनी अक्षय्या तृतीयेचा मुहुर्त साधत ग्रह प्रवेश केला.
लातूर शहरातील तनिष्कच्या शॉपमध्ये ग्राहकांना पसंतीस पडतील असे सोन्याचे दागीने विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. ग्राहकांनी अंगठी, बांगडया, मंगळसुत्र, सोन्याचे हार आदी दागीने खरेदीला पसंती दिली. या दालनातील नवनविन सोन्याचे दागीने ग्राहकांचे खास आकर्षन ठरत आहेत. या दागीण्यांना ग्राहकांची चांगली मागणीही होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR