Homeनांदेडआंतरजिल्हा टोळीतील २ आरोपी गजाआड

आंतरजिल्हा टोळीतील २ आरोपी गजाआड

घरफोडीच्या ६ घटना उघडकीस

नांदेड : प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरी व घरफोडी करणा-या आंतर जिल्हा टोळीतील २ आरोपींना गजाआड केले आहे. त्यांच्याकडून १ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांना मालाविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार स्थागुशा चे पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड, बालाजी कदम, प्रमोद जोंधळे, इमरान शेख, अमोल शेख, सायबर सेलचे राजू सिटीकर त्यांचे पथक ९ मे रोजी शोध मोहीम राबवीत होते. पथकाला जिल्ह्यात व इतर ठिकाणी घरफोडी व चो-्या करणारे टोळीतील आरोपी दुचाकीवर बसून चोरीतील रोख रक्कम घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

त्यानुसार पथकाने मोदी ग्राऊंड येथे सखोजी नगर येथील रहिवासी आरोपी दीपसिंग किशोरसिंग तिलपितिया, महेंद्रसिंग उर्फ सनी देवेंद्रसिंग भोसीवाले यांना ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी आरोपी हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील जोगिंदरसिंग टाक उर्फ चव्हाण याच्या मदतीने लोहा, कंधार, हिमायतनगर, विमानतळ, नांदेड ग्रामीण व देऊळगावराजा ( जि. बुलढाणा ) या ६ ठिकाणी चोरी व घरफोडी केल्या बाबतची कबुली दिली. टोळीतील २ आरोपींकडून १ दुचाकी व चोरी करून मिळवलेली रोख रक्कम असा एकूण १ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना लोहा पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या आंतर जिल्हा टोळीतील आरोपींना पकडल्यामुळे आता अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR