आधार-पॅन कार्डचा मनी लॉड्रिंगमध्ये वापर

सुप्रीम कोर्टाचे वॉरंट, डिजिटल अरेस्टच्या नावाखाली लूट

मुंबई : प्रतिनिधी
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली नागरिकांना भीती दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणा-या एका मोठ्या आंतरराज्यीय टोळीचा मुंबई पोलिसांच्या पश्चिम विभाग सायबर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. देशातील विविध राज्यांत एकाच वेळी विशेष मोहिमेअंतर्गत धाडी टाकत पोलिसांनी या टोळीतील ७ सराईत आरोपींना बेड्या ठोकल्या. या टोळीने एका नागरिकाला डिजिटल अरेस्टची भीती दाखवून १ कोटी ६७ लाख ४० हजार रुपयांचा गंडा घातला होता.

आरोपींनी फिर्यादीशी संपर्क साधून त्यांच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डचा वापर एका मोठ्या मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात झाल्याचा बनाव रचला. तुमच्या बँक खात्यांची तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे आणि तुमच्या विरोधात सुप्रीम कोर्टातून अटक वॉरंट निघाले आहे, अशी भीती त्यांना घालण्यात आली. अटक आणि कायदेशीर कारवाईच्या दहशतीखाली आरोपींनी फिर्यादीला तब्बल १ कोटी ६७ लाख रुपये त्यांच्या विविध बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडिताने मुंबई सायबर पोलिसांत धाव घेतली.

विविध राज्यांत
एकाच वेळी धाडी
गुन्हा दाखल होताच मुंबई सायबर गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारे देशातील विविध राज्यांमध्ये एकाच वेळी छापेमारी करत ७ आरोपींना अटक केली. या आरोपींमध्ये संजय शाह, ऋषी रामचंद्र मीना, नौशाद अली, मोहम्मद खालीद सैफी, जगेश्वर महतो, जाबीर हुसेन आणि एका महिलेची समावेश आहे.

२७ मोबाईल,
६१३ सिमकार्ड जप्त
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले मोठे साहित्य जप्त करण्यात आले. यात २७ मोबाईल, २ लॅपटॉप, ५ डिजिटल सही साधने, ६१३ सीमकार्ड, १० चेकबुक, २ पासबुक आणि २ एटीएम कार्ड आदी साहित्य जप्त करण्यात आले.

खात्यातीर रक्कम गोठविली
आरोपींचे विविध बँक खात्यांमधील ३४ लाख रुपये पोलिसांनी तातडीने गोठवले. आरोपींनी डिजिटल अरेस्टची भीती दाखवून देशात आणखी कोणाची फसवणूक केली आहे का? याचा सखोल तपास मुंबई पोलिस करत आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17

Latest news