नाशिक जिल्ह्यात भूकंपाची मालिका ; २९ जुलैपासून २० धक्के

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, दिंडोरी, कळवण भागात जुलैमध्ये सलग पाच दिवस भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. त्यानंतर दि. ५, ६ व ८ ऑगस्ट रोजी रात्री १० च्या सुमारास पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल ४.३ एवढी नोंदविण्यात आली.

तुलनेत यावेळी भूकंपाची तीव्रता आणि विस्तार वाढला असून, जिल्ह्यातील १० तालुक्यांमध्ये हे धक्के जाणवले. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून होणारा भूकंप ‘अर्थक्वेक स्वार्म’ प्रकारातील म्हणजे समूह भूकंप असून, नागरिकांनी घाबरून न जाता, सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

शनिवारी (दि. ८) रात्री १० च्या सुमारास नाशिकसह दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण, निफाड, बागलाण, चांदवड, देवळा आणि सिन्नर या तालुक्यांना भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या भूकंप मालिकेने नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. दि. २९ जुलैपासून जिल्ह्यात २० धक्के नोंदविण्यात आले.

शनिवारी रात्री जाणवलेला ४.३ रिश्टर स्केलचा धक्का या मालिकेतील सर्वाधिक तीव्र ठरला. यामुळे नाशिक शहरासह दिंडोरी, पेठ, कळवण, सुरगाणा आणि चांदवड परिसर हादरला. पेठ तालुक्यातील काही गावांत घरासह मंदिराच्या भिंतींना तडे गेले. शाळेच्या भिंतींची पडझड झाली. भूकंपाची खोली पाच किलोमीटर असून, केंद्रबिंदू २०.४२४ अंश उत्तर अक्षांश आणि ७३.६८२ अंश पूर्व रेखांशावर, सुरगाणा तालुक्याच्या आसपास असल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्याचप्रमाणे शहरात उंच इमारतींमध्ये राहणा-या नागरिकांना भूकंपाचे हादरे प्रकर्षाने जाणवले. चांदवड आणि देवळा परिसरात धक्का तुलनेने सौम्य होता. पेठ, दिंडोरी आणि कळवण तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचे हादरे जाणवले. पेठमधील पहुचीबारी जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीला भगदाड पडले. जुनोठी येथे मंदिराची भिंत कोसळली. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून उपलब्ध माहितीच्या आधारे परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. अत्याधुनिक भूकंपमापन यंत्रणेमुळे आपत्ती व्यवस्थापन क्षमतेला मदत होणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

६ ऑगस्टला १२ तासांत सहा धक्के
जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवण्यास दि. २९ जुलैपासून सुरुवात झाली. त्यानंतर सुरगाणा, दिंडोरी आणि लगतच्या परिसरात सातत्याने सौम्य भूकंप नोंदविले गेले. ६ ऑगस्टला अवघ्या १२ तासांमध्ये सहा भूकंपाचे धक्के नोंदविण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील भूकंपाच्या हालचालींकडे प्रशासन आणि राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राचे विशेष लक्ष आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17

Latest news