डॉ. प्रमोद चौधरी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर अ‍ॅडव्हान्स्ड बायोइकॉनॉमी केंद्राचे उद्घाटन

पुणे : प्रतिनिधी
जागतिक जैवइंधन दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात डॉ. प्रमोद चौधरी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर अ‍ॅडव्हान्स्ड बायोइकॉनॉमी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. जैव-अर्थव्यवस्थेच्या उदयोन्मुख क्षेत्रात आंतरशाखीय संशोधन शिक्षण तसेच उद्योग-सहकार्याला चालना देणारे हे केंद्र एक महत्त्वपूर्ण आणि दिशादर्शक उपक्रम ठरणार आहे.

विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागात हे केंद्र स्थापन करण्यात आले असून,प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक व कार्यकारी अध्यक्ष उद्योजक डॉ.प्रमोद चौधरी यांच्या सहकार्याने केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. डॉ.चौधरी यांनी केंद्राच्या स्थापनेसाठी ७५ लाख रुपयांची देणगी दिली आहे. उद्घाटनप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी,प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी,विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग कळकर,विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रविंद्र शिंगणापूरकर,तंत्रज्ञान विभागातील डॉ. सोमनाथ नंदी प्राज इंडस्ट्रीजचे घनश्याम देशपांडे उपस्थित होते.

केंद्राविषयी सादरीकरण करताना डॉ.सोमनाथ नंदी यांनी सांगितले की,केंद्राच्या माध्यमातून चालू शैक्षणिक वर्षापासूनच एम.टेक.च्या विद्यार्थ्यांसाठी दोन नवीन अभ्यासक्रम ओपन इलेक्टिव्ह म्हणून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.यामध्ये ‘शाश्वत विकासासाठी जैव-अर्थव्यवस्था’ आणि‘जैवइंधन व जैवऊर्जा’ या दोन अभ्यासक्रमांचा समावेश आहे.दोन्ही अभ्यासक्रमांना विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेने नवीन ऐच्छिक अभ्यासक्रम म्हणून मान्यता दिली आहे.
शाश्वत भविष्यातील वाटचालीसाठी केवळ तांत्रिक नवोन्मेष पुरेसा नाही.त्यासाठी कुशल मनुष्यबळ,सक्षम संस्था आणि अर्थपूर्ण सहकार्य आवश्यक आहे.भविष्यातील आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी शिक्षणक्षेत्र,उद्योग आणि संशोधन यांना एका व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने या सेंटर ऑफ एक्सलन्सची संकल्पना साकारण्यात आली आहे.जैव-अर्थव्यवस्थेला गती देणा-या प्रतिभावान मनुष्यबळाची जडणघडण करण्याचे काम केंद्रामार्फत केले जाईल.

समाजावर सकारात्मक परिणाम घडवून आणणा-या तंत्रज्ञानाच्या निर्मितीत विद्यापीठांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.या सेंटर ऑफ एक्सलन्सच्या स्थापनेमुळे आंतरशाखीय संशोधन,आणि उद्योग-सहकार्याप्रती बांधिलकी अधिक दृढ झाली आहे.असे कुलगुर डों गोसावी यांनी सांगितले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17

Latest news