इ. स. १८७० चे शिवाजी महाराजांचे चित्र प्रकाशात

सोलापूर : विजयसिंह जाधव
जर्मनी येथील एका संग्रहालयांमध्ये जपून ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन इ. स. १८७० च्या दशकात जर्मनीमध्ये प्रकाशित झालेल्या चित्राचा शोध लागला आहे. जर्मनी संग्रहालयांमध्ये सुरक्षित असलेली ही चित्रे समोर आणली असून, ही चित्रे छत्रपती शिवरायांच्या समकालीन असल्याने त्यांचे ऐतिहासिक मूल्य मोठे आहे. यामुळे इतिहासाच्या वैभवात भर पडली आहे,’ असे इतिहास अभ्यासक आशुतोष पाटील यांनी सांगितले.

भारतात आलेल्या तत्कालीन युरोपीयन व्यापा-यांमार्फत प्रथम ती युरोपमध्ये हस्तांतरीत झाली व नंतर वेगवेगळ््या वस्तुसंग्रहालयात पोहोचली. परदेशातील संग्रहालयांनी हा ऐतिहासिक वारसा जपला आहे. ही चित्रे पहिल्यांदाच मराठी माणसांसमोर येत आहेत. नैसर्गिक जलरंग आणि सोने वापरून काढलेली अनेक भारतीय राजपुरुषांची चित्रे परदेशातील वस्तुसंग्रहालयांमध्ये सुरक्षित आहेत. असे आशुतोष पाटील यांनी सांगितले.

या चित्राचे निरीक्षण केल्यास लक्षात येते की मनुची, लँग्लेस, झेवियर या तिघांनी प्रकाशित केलेल्या चित्राचा संदर्भ घेऊन हे चित्र तयार झाले असावे. या चित्रात शिवरायांसह मोठे सैन्य दिसत नसले तरी काही मुस्लिम पेहेरावातील सैनिक हातात ढाल व तलवार घेऊन घोड्याच्या समोरच्या बाजूला उभे दिसतात. या चित्रात शिवरायांचा घोडा सजवलेला असून तो चालतो आहे, असा दाखवलेला आहे, त्याच्या गळ््यात वाघनखदेखील दिसते. या चित्रात शिवरायांनी डाव्या हाताने घोड्याचा लगाम पकडलेला असून उजव्या हातात दांडपट्टा आहे. शिवराय शाही पोशाख घालून आहेत. त्यांच्या छातीवर चंद्रकोर आहे व उजव्या बाजूच्या कमरेला कट्यार आहे. हे चित्र शिवोत्तर काळात चित्र बघून काढले गेल्याने व चित्रकाराला मराठा राज्याबद्दल फार माहिती नसल्याने शिवरायांचे शिरोभूषण हवे तेवढे अचूक रेखाटलेले नाही आणि ते अपेक्षितही आहे. पण चित्रकाराने केलेला हा प्रयत्न वाखाणण्याजोगा असून फारच परिश्रम घेऊन हे चित्र स्टील इंग्रेव्हिन्ग पद्धतीने प्रिंट केले आहे. जर्मनीत प्रकाशित झालेल्या या चित्रामुळे शिवरायांची वैश्विकता अधिकच अधोरेखित होते. पॅरिस येथील चित्राची माहिती अभ्यासक आशुतोष पाटील यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांची आजपर्यंत २५ हून अधिक समकालीन व उत्तरकालीन चित्रे ज्ञात आहेत. या चित्रांचा अभ्यास करताना त्यांचे आलेले उल्लेख कामी येतात, त्यावरून ‘शिवस्वरूप’ समजून घेता येते. असे पाटील यांनी सांगितले. इतिहास संशोधक आशुतोष पाटील यांनी नुकतेच ‘अश्वारूढ शिवराय’ याच धाटनीचे एक नवीन चित्र शोधून काढले आहे. जे की, इ. स. १८७० च्या दशकात जर्मनीत प्रकाशित झाले होते. आजपर्यंत हे चित्र अज्ञात होते व प्रथमत: हे प्रकाशित होत आहे. हे चित्र निकोलाओ मनुची याच्या अल्बममधील ‘अश्वारूढ शिवराय’ या चित्राचा आधार घेऊन तयार करण्यात आले असावे. हे महाराजांचे चित्र पॅरिसमधील मनुची संग्रहात असलेल्या चित्राची प्रतिकृती आहे. महाराजांच्या सुमारे २१५ वर्षांनंतर हे चित्र तयार केले असून चित्रकाराला भारतीय पेहेराव, शस्त्र, अलंकार यांची फार माहिती नसावी. असे असले तरी फारच परिश्रम घेऊन हे चित्र स्टील इंग्रेव्हिन्ग पद्धतीने प्रिंट केले. या पुस्तकात भारतात आढळणा-या शस्त्रास्त्रांचा इतिहास लिहिलेला आहे. आज या माध्यमातून शिवाजी महाराजांचे महत्वाचे चित्र लोकांसमोर येत आहे.

पानाच्या मूळ स्थानाचा शोध
या पानावर ईस्ट इंडिया या शीर्षकांतर्गत महत्वाची माहिती दिलेली आहे, ज्यात अनेक स्थळे, त्यांची लोकसंख्या, भारतातील धर्म, ब्रिटिश राज्य व त्याचा विस्तार, रेल्वे रूळ व त्यांचा विस्तार, नद्या, जंगल, विविध प्राणी, आदिवासी जमाती याबद्दल सविस्तर लिहिलेले आहे. जर्मनीमध्ये प्रकाशित झालेल्या या ग्रंथात भारताचे प्रतिनिधित्व म्हणून शिवाजी महाराजांचे चित्र प्रकाशित होते, ही नक्कीच महत्वाची बाब आहे. या पानावर दक्षिण भारताचे प्रतिनिधित्व म्हणून मंदिर, मध्यभारताचे शिवाजी महाराज आणि मुघलांचे प्रतिनिधित्व म्हणून हरम दाखवली आहे. आशुतोष यांना हे अस्सल पान मिळाले आणि त्या पानाच्या मूळ स्थानाचा शोध घेत कळले की हे चित्र १८७० च्या दशकात प्रकाशित झाले होते.

निवडक प्रतिमांमध्ये शिवरायांचे चित्र
इ. स. १८७० च्या दशकात जर्मनीत प्रकाशित झालेल्या ज्ञानकोशात छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र भारताचे प्रतिनिधित्व करणा-या अत्यंत मर्यादित निवडक प्रतिमांमध्ये समाविष्ट झालेले दिसते, ही बाब इतिहासदृष्ट्या अत्यंत लक्षणीय आहे. यावरून एकोणिसाव्या शतकातच शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व आणि मराठा साम्राज्याची राजकीय उभारणी यांची दखल युरोपीय अभ्यासकांनी घेतली होती, हे स्पष्ट होते.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
'लातूर पॅटर्न' : एका शैक्षणिक क्रांतीचा उगम, सुवर्णकाळ आणि बदलत्या प्रवासाचा अंतर्वेध
06:11
Video thumbnail
नांदेडमध्ये डिझेलचा तुटवडा; वाहनधारकांची परवड, तर जिल्हाधिकाऱ्यांचा 'पायी चालण्याचा' अजब सल्ला!
03:03
Video thumbnail
लातूर पॅटर्नवर पेपर फुटीचे सावट? ट्युशन एरियातून ग्राउंड रिपोर्ट!
08:41
Video thumbnail
BIG BREAKING : नामांकित डॉक्टर सीबीआयच्या रडारवर, औसा रोड परिसरातील हॉस्पिटलमध्ये चौकशी सुरू!
02:38
Video thumbnail
NEET पेपरफुटीविरोधात माढ्यात युवक काँग्रेस आक्रमक; शाहूराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन
01:16
Video thumbnail
Latur|नीट पेपर फुटी प्रकरणातील इनसाईड स्टोरी A to Z
09:46
Video thumbnail
लातूरच्या RCC क्लासवर CBI ची पुन्हा कारवाई; संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या मुलाची चौकशी
03:44
Video thumbnail
NTA समिती बरखास्त करा आणि RCC क्लासेसचे शुल्क परत करा; संतप्त लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
04:08
Video thumbnail
नीट प्रकरणी लातुरातून दोन विद्यार्थ्यांसह पालकांची चौकशी, गुरुवारी पुण्यात हजर राहण्याचे आदेश1
04:08
Video thumbnail
मुक्कामी बसच्या प्रवाशांना अंधाराचा सामना; तावशीगड येथील मुख्य चौकात 'बत्ती गुल'!
01:51
Video thumbnail
MNS PROTEST|लातूर : RCC क्लासेसवर मनसेचे अंडेफेक आंदोलन
01:09
Video thumbnail
RCC चे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या अटकेनंतर अभाविप आक्रमक; राज्यभरात तीव्र आंदोलनाचा ईशारा
02:51
Video thumbnail
कर्नाटकात दुर्घटना! दुबारे कॅम्पमध्ये दोन हत्तींमध्ये थरारक झुंज; ३३ वर्षीय महिला पर्यटकाचा मृत्यू
00:23
Video thumbnail
प्रा. मोटेगावकरांच्या अटकेमागे 'हा' व्हिडिओ कारणीभूत; तपासाला वेग.
01:00
Video thumbnail
Shivraj Motegavkar Arrest|प्रा. शिवराज मोटेगावकरांना १० दिवसांची CBI कोठडी;ईडीचीही एन्ट्री
02:45

Latest news