एकनाथ शिंदेंप्रमाणे फडणवीसांनीही आपली चूक मान्य करावी

पंढरपूर : प्रतिनिधी
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिलेल्या नोंदी रद्द करणे ही आमची चूक होती, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य करावे, अशी मागणी जरांगे यांनी केली. तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केला हेही मान्य करावे, असे ते म्हणाले.

पंढरपूर येथे माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली चूक सुधारण्याची भूमिका घेतल्याचा दावा करत फडणवीस यांनीही त्याच पद्धतीने भूमिका घ्यावी, असे जरांगे यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे म्हणाले की, दिलेल्या नोंदी रद्द करणे ही आमची चूक होती, हे देवेंद्र फडणवीस यांनी मान्य करावे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केला हे त्यांनी मान्य करावे. ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांच्यामार्फत आपली झालेली चूक सुधारू, असे सांगितले, तशीच भूमिका फडणवीस का घेत नाहीत? त्यांना संपूर्ण समाजाचा रोष अंगावर घ्यायचा आहे का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना मनोज जरांगे म्हणाले, फडणवीस हे पहिले फडणवीस राहिले नाहीत. गेले वर्षभर मी त्यांच्यावर कोणताही शब्द बोललो नाही. मात्र ते ओबीसीचे रक्त आहे असे सांगतात, म्हणजेच ते ओबीसीचे मुख्यमंत्री आहेत. पण, मराठा समाजावर अन्याय कशाला करता?, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

कुणबी प्रमाणपत्रे आणि नोंदी रद्द करण्याच्या मुद्यावरूनही मनोज जरांगे यांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाट यांच्यावर आरोप केले. ते म्हणाले, ‘‘दाखले रद्द करण्यात बावनकुळे आणि संजय शिरसाट हे दोघे असून दोघांचीही पत्रे आमच्याकडे आहेत. मी पुराव्याशिवाय बोलत नाही. यावेळी मी एकदा तरी छगन भुजबळ आणि त्या धनंजय मुंडेचे नाव घेतले का? जरी माझा त्यांच्यावर राग असला तरी मी पुराव्याशिवाय कोणावरही आरोप करत नाही, असा पुनरुच्चार जरांगे यांनी केला.

मी कोणाचाही नसून फक्त मराठ्यांचा
आपल्या आंदोलनामागे कोणताही वैयक्तिक राजकीय हेतू नसल्याचे स्पष्ट करताना मनोज जरांगे म्हणाले, ‘‘मी कोणाचाही नसून मी फक्त मराठ्यांचा आहे. कुणाशीही संबंध वाढवण्यासाठी मी आंदोलने करत नाही. फडणवीस साहेब, तुम्ही गैरसमजात राहू नका. यांना बहुमताची मस्ती आहे, मात्र ही मस्ती आम्ही उतरवू, आता यांना सुट्टी नाही, असा इशारा देखील जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अयोध्येत रामललाच्या चरणी यामी गौतम; दर्शन आणि आशीर्वादानंतर केले 'नई नवेली' चित्रपटाचे प्रमोशन.
00:53
Video thumbnail
Hingoli|जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये!तहसील कार्यालयात अचानक धडक
02:31
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो, गुंठेवारीची प्रकरणे दाखल केलीत का? ३१ डिसेंबर अंतिम मुदत!
01:10
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उत्सुकता वाढली! दोन दिवसांत २२९ अर्जांची विक्री
02:47
Video thumbnail
Latur|ऐन दुष्काळात आगीचं तांडव, 15 एकर ऊस जळून खाक #breakingnews
00:26
Video thumbnail
Latur|बशीर शेखच्या इमारतींचा वाद; कागदपत्रांसाठी महापालिकेकडे वेळेची मागणी!
04:15
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो सावधान! नळाला तोटी नसेल तर २५ हजारांचा दंड; महापालिकेचा अलर्ट
02:39
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
21:34
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
00:00
Video thumbnail
Latur|आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी RTO चा सुरक्षा कवच!
06:24
Video thumbnail
Purna|बळीराजा साखर कारखान्याच्या १३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसाला ३,३००.७६ रुपये भाव जाहीर
02:36
Video thumbnail
Latur Drought|लातूरच्या दुष्काळावर तोडगा कधी? निलंगेकरांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक
02:25
Video thumbnail
Bashir Shaikh|लातूरच्या बशीर शेखविरोधात POCSO अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल!
03:21
Video thumbnail
Tuljapur|तुळजाभवानी मंदिरात पोलिसांची दादागिरी? सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
00:39
Video thumbnail
Latur|पदवीधर निवडणुकीत वचननाम्यावरून वाद! बालाजी पाटील चाकूरकर अडचणीत येणार?
02:16

Latest news