29.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूरएमआयडीएसआर दंत रुग्णालय व महाविद्यालयास ‘नॅक’चे ‘ए’ ग्रेड मानांकन

एमआयडीएसआर दंत रुग्णालय व महाविद्यालयास ‘नॅक’चे ‘ए’ ग्रेड मानांकन

लातूर : प्रतिनिधी
माईर्स पुणे संचलित एमआयडीएसआर दंत रुग्णालय व महाविद्यालयालयास ‘ए’ ग्रेड मानांकन प्राप्त झाले आहे. राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेने नुकतेच दंत रूग्णालय व महाविद्यालयाचे मूल्यांकन करून हे मानांकन बहाल केले. या मानांकनामुळे मराठवाड्यासह राज्यातील दंत शाखेचे गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि दर्जेदार दंत रोग उपचार सेवा देणारी एक अग्रगण्य व विश्वसनीय संस्था म्हणून एमआयडीएसआर दंत रूग्णालय व महाविद्यालय सिध्द झाले आहे.
राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेच्या त्रिसदस्यीय तपासणी समितीने दि. १५ व १६ फेब्रुवारी रोजी लातूर येथील एमआयडीएसआर दंत रूग्णालय व महाविद्यालयास भेट देत रूग्णालय व महाविद्यालयातील पायाभूत सेवा-सुविधासह दंत रूग्णोंपचार कार्यप्रणाली, दंत शिक्षण व दंत रोग उपचार यासाठी अवश्यक अत्याधुनिक उपकरणांची उपलब्धता, दंत शाखेतील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासाठी केलेले कामकाज, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी केलेले विविध प्रकारचे संशोधन व उपक्रमांची माहिती घेतली.
 त्याचबरोबर मध्यवर्ती सुसज्ज्­ ग्रंथालय, स्वतंत्र डिजिटल लॅब्ररी, शहरी व ग्रामीण भागातील दंत रोग उपचासाठी कार्यरत तीन सॅटेलाईट सेंटर, जैविक कचरा व्यवस्थापन, विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह व कर्मचा-यांसाठी निवास व्यवस्था, क्रिडांगण, पर्यावरणपुरक परिसरासाठी सौर उर्जा निर्मीती, जल पुर्नभरण प्रकल्प आणि महाविद्यालय स्तरावरील कार्यरत असलेल्या विविध समित्या, धारेणात्मक स्वरूपात कार्यप्रवण असलेली अंतर्गत गुणवत्ता मापक समिती यासह आदी बाबींची सखोल गुणवत्ता तपासणी या समितीकडून करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या दहा दिवसाच्या आतच राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन परिषदेने एमआयडीएसआर दंत रुग्णालय व महाविद्यालयास ‘ए’ ग्रेड मानांकन बहाल केले आहे.
एमआयडीएसआर दंत रुग्णालय व महाविद्यालयालयास ‘नॅक’चे ‘ए’ ग्रेड मानांकन मिळाल्याबद्दल माईर्स एमआयटी पुणेचे संस्थापक-विश्वस्त प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड, कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड यांनी प्राचार्य डॉ. सुरेश कांगणे, डॉ. यतिशकुमार जोशी आदींचे कौतुक केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR