33.5 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeलातूरऔराद शहाजानीचे तापमान ४२ अंश सेल्सिअस

औराद शहाजानीचे तापमान ४२ अंश सेल्सिअस

औरादसह परिसर तापला
नागरिकांच्या अंगाची उकाड्याने लाही लाही
लक्ष्मण पाटील
निलंगा : प्रतिनिधी
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीचे तापमान ४२ अंश सेल्सिअस झाल्याने गर्मीने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे . दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने नागरिकांचा जीव गर्मीने कासावीस होत आहे. यामुळे नागरिक थंड पेयाकडे वळत आहेत. औरादचे तापमान ४२ अंश सेल्सिअस झाल्याने औरादसह परिसर तापला आहे.

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी हे शहर तेरणा व मांजरा नदीच्या मुशीत वाढल्याने थंडीच्या दिवसांत कडाक्याची थंडी असते व गर्मीच्या दिवसांत तापमानात वाढ होऊन गर्मी जास्त असते. त्यातच गत तीन दिवसांपासून औराद शहाजानीचे तापमान वाढत असल्याने नागरिकांना गर्मीच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. गर्मीमुळे वयोवृद्ध माणसे व बालकांना उष्णतेचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तापमानात वाढ झाल्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. यातून सुटका मिळावी, यासाठी नागरिक दुपारच्या वेळी सावलीचा आधार घेत आहेत. यामुळे दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट दिसत असून, शीतपेय केंद्रांवर गर्दी दिसत आहे.

टोप्या, गमछाचा वापर
उष्णतेपासून संरक्षण मिळावे, म्हणून नागरिक डोक्यावर टोप्या, गमच्या, छत्री आदींचा वापर करत आहेत. गेल्या ३ दिवसांपासून औरादच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यात ३१ डिसेंबर रोजी कमाल ४०.०५ तर किमान २६ अंश सेल्सिअस, १ एप्रिल रोजी कमाल ४१ अंश सेल्सिअस व किमान २६ .०५ आणि २ एप्रिल रोजी कमाल ४२ अंश सेल्सिअस व किमान २७.०५ अंश सेल्सिअस झाले असल्याचे औराद येथील हवामान केंद्राचे मुक्रम नाईकवाडे यांनी एकमतशी बोलताना सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR