औषधी विक्रेत्यांच्या बंदला जिल्ह्यात प्रतिसाद 

लातूर : प्रतिनिधी
अखिल भारतीय औषधी विक्रेत्यांच्या देशव्यापी बंदला बुधवारी लातूर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लातूर जिल्ह्यातील सर्व औषधी विक्रेत्यांनी आपआपली औषधी दुकाने बंद ठेऊन बंद यशस्वी केला. लातूर शहरातील महात्मा गांधी चौकात सकाळी साडेनऊ ते दुपारी एक या वेळेत धरणे आंदोलनही करण्यात आले.
ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात बुधवार, दि. २० मे रोजी देशव्यापी बंदचे आवाहन केले होते. या  आवाहनानुसार   लातूर जिल्ह्यातील औषधी विक्रेत्यांनी या बंदमध्ये  १०० टक्के  सहभाग नोंदविला.  औषध विक्री व्यवसाय हा औषधे आणि सौंदर्य प्रसाधने अधिनियमांतर्गत चालवला जातो. औषधांची ऑनलाईन विक्री करण्यासंदर्भांत अधिनियमात कोणतीही तरतूद नाही. तरीही केंद्र सरकारने इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन औषध विक्रीबाबतची सूचना जारी केली  होती.  त्या सूचनेचे अद्याप कायद्यात रूपांतर झालेले नसतानाही देशात बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री सुरु आहे.
यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल असून दिल्ली उच्च न्यायालयानेही ऑनलाईन औषध विक्रीस स्थगितीही दिली आहे. असे असतानाही सरकार औषधी विक्रेत्यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे. सरकारने कोरोनाच्या काळात औषधांच्या होम डिलिव्हरी देण्याबाबत विशेष सूट दिली होती. कोरोना संपूनही बराच काळ  उलटला तरी याबाबतची  अधिसूचना रद्द करण्यात आलेली नाही. याचा गैरफायदा घेऊन ऑनलाईन औषध विक्री केली जात आहे. यामुळे अनेक छोटे व्यावसायिक – औषध विक्रेते अडचणीत येत आहेत. ग्रामीण भागातील औषधी वितरण व्यवस्था धोक्यात येत आहे. यासंदर्भात शासन – प्रशासनाकडेही वारंवार निवेदने देण्यात आली आहेत. तरीही यावर अद्याप कोणतीही कारवाई   करण्यात आली नसल्याच्या निषेधार्थ सदर देशव्यापी बंदचे आवाहन करण्यात आले होते.  औषधी विक्रेत्यांचा बंद असला तरी अत्यावश्यक औषधींसाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये याकरिता ही काळजी घेण्यात आल्याचे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष रामदास भोसले यांनी  सांगितले.
लातूर जिल्ह्यातील सर्व औषधी विक्रेत्यांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल   लातूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष रामदास भोसले, सचिव अरुण सोमाणी, उपाध्यक्ष ओमप्रकाश बाहेती, अनिल स्वामी, धनंजय जोशी, सत्यवान सूर्यवंशी, रामकुमार सोनटक्के, सहसचिव प्रकाश साखरे, ईश्वरचंद्र बाहेती, अंकुश भोसले,  संगमेश्वर नीला, कोषाध्यक्ष अतुल कोटलवार, रमेश भांगडिया, नाथराव मुंडे, नागेश स्वामी, सौ. दीपाली निनगुरकर, जयप्रकाश रेड्डी, बालाजी थेटे, रमाकांत भुरकापल्ले
आदींनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
धर्माबाद तालुक्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
01:59
Video thumbnail
धीरजभैय्या देशमुख यांच्या नेतृत्वात लातूरमध्ये क्रिकेटचा महाकुंभ; विलासराव देशमुख चॅम्पियनशिप २०२६..
02:56
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|डॉक्टरांच्या मुलांसह मोटेगावकरांच्या मुलांसाठी खास क्लास ?CBI च्या चौकशीत उघड
01:49
Video thumbnail
BIG BREAKING : लातूरच्या नारायण नगर परिसरात CBI ची धडक;विद्यार्थ्याने नीट पेपर विकत घेतल्याचा संशय
01:48
Video thumbnail
टेंभुर्णीत भीषण आग! फर्निचर, हार्डवेअरसह इलेक्ट्रॉनिक्सची ३ दुकाने खाक; कोट्यवधींचे नुकसान
01:46
Video thumbnail
हिमायतनगर तालुक्यात पेट्रोल-डिझेलचा प्रचंड तुटवडा; शेतीची कामे रखडल्याने शेतकरी आक्रमक
03:18
Video thumbnail
ऑनलाईन औषध विक्रीविरोधात जळकोट तालुक्यात 'केमिस्ट'चा कडकडीत बंद; तहसीलदारांना निवेदन!
02:05
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|ED च्या रडारावर प्रा. शिवराज मोटेगावकरांची बेहिशोबी संपत्ती?
05:06
Video thumbnail
ब्रेकिंग : मोटेगावकरांच्या पत्नीला देखील CBI ची नोटीस
02:09
Video thumbnail
'लातूर पॅटर्न' : एका शैक्षणिक क्रांतीचा उगम, सुवर्णकाळ आणि बदलत्या प्रवासाचा अंतर्वेध
06:11
Video thumbnail
नांदेडमध्ये डिझेलचा तुटवडा; वाहनधारकांची परवड, तर जिल्हाधिकाऱ्यांचा 'पायी चालण्याचा' अजब सल्ला!
03:03
Video thumbnail
लातूर पॅटर्नवर पेपर फुटीचे सावट? ट्युशन एरियातून ग्राउंड रिपोर्ट!
08:41
Video thumbnail
BIG BREAKING : नामांकित डॉक्टर सीबीआयच्या रडारवर, औसा रोड परिसरातील हॉस्पिटलमध्ये चौकशी सुरू!
02:38
Video thumbnail
NEET पेपरफुटीविरोधात माढ्यात युवक काँग्रेस आक्रमक; शाहूराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन
01:16
Video thumbnail
Latur|नीट पेपर फुटी प्रकरणातील इनसाईड स्टोरी A to Z
09:46

Latest news