29.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूरकाँग्रेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बुथप्रमुख यांचे मानले आभार

काँग्रेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बुथप्रमुख यांचे मानले आभार

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. ८ मे रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बुथप्रमुख यांची भेट घेऊन लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीच्या विजयासाठी अहोरात्र मेहनत घेतल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. काँग्रेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बुथप्रमुख यांच्याकडून मतदानाची आकडेवारी, त्या-त्या भागातील मतदानाचे  वातावरण आदी विविध विषयांवर चर्चा करून माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर लोकसभा मतदारसंघातील लातूर शहर, निलंगा, उदगीर शहर विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाचा आढावा घेऊन आपल्या बुथवर ८० टक्के मतदान करून घेतलेल्या बुथप्रमुखांचे त्यांनी कौतुक केले.
या वेळी लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोईज शेख, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, माजी महापौर दीपक सूळ, काँग्रेसचे लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक सर्जेराव मोरे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, उदगीर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे निरीक्षक रवींद्र काळे, उदगीर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कल्याण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी चंदन पाटील नागराळकर, प्रा. शहाजी मुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उदगीर तालुकाप्रमुख चंद्रकांत टंगेटोल, शहरप्रमुख अनिल पंचाक्षरी, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, उपसभापती सुनील पडिले, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे, उपसभापती प्रिती भोसले, प्रा. प्रवीण कांबळे, निलंगा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे निरीक्षक संतोष देशमुख, माजी नगराध्यक्षा उषा कांबळे, डॉ. जी. बी. सोनकांबळे, सचिव अभय साळुंके, मंजूरखान पठाण,  सचिन बंडापल्ले, महेश काळे, डॉ. अरविंद भातंबरे,
 चक्रधर शेळके, गिरीश ब्याळे, अंगद वाघमारे, पंकज शेळके, महेश देशमुख, पद्माकर उगिले,  विजयकुमार साबदे, अ‍ॅड. फारुक शेख, आबासाहेब पाटील उजेडकर, पुनित पाटील, माजी सभापती अजित माने, निलंगा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील, व्यंकटेश पुरी, प्रवीण सूर्यवंशी, राजा माने, अशोक कोरे, बसवराज मठपती, संतोष बिरादार, दत्ता सुरनर, अशोक गोविंदपूरकर, सपना किसवे, एन.आर. पाटील, आनंद पवार, दिलीप पाटील नागराळकर, रवींद्र कोरे, जगदीश बाहेती, राजकुमार पाटील, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, असिफ बागवान, कैलास कांबळे, अहमदखा पठाण, अभिजित अंकलकोटे, बसवंतआप्पा भरडे, दगडूआप्पा मिटकरी, गोविंद डुरे, चंद्रकांत मद्दे, विजय गायकवाड, विवेक जाधव, हर्षवर्धन सवई, यशपाल कांबळे, तबरेज तांबोळी, ख्वॉजा शेख, विष्णुदास धायगुडे आदींसह काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, बुथप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR