26 C
Latur
Monday, May 13, 2024
Homeराष्ट्रीयकेजरीवाल यांना ६ दिवसांची ईडी कोठडी

केजरीवाल यांना ६ दिवसांची ईडी कोठडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित ‘मनी लाँड्रिंग’ प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाने ६ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. गुरुवारी रात्री केजरीवाल यांना ईडीने अटक केली होती. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून निर्णय राखून ठेवला होता. अखेर रात्री साडे आठ वाजता न्यायालयाने त्यांना ६ दिवसांची ईडी कोठडी सुनावली.

राजधानी दिल्लीतील वादग्रस्त मद्यधोरणाशी संबंधित प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावलेले असतानाही केजरीवाल अनेकदा गैरहजर राहिले. या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून नऊ वेळा समन्स बजाविण्यात आले होते. परंतु केजरीवाल यांनी एकाही समन्सला उत्तर दिलेले नव्हते किंवा ईडीसमोर हजरही राहिले नाहीत. गुरूवारी रात्री त्यांच्यावर ईडीने अटकेची कारवाई केली.

ईडीने केजरीवाल यांची १० दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने त्याला ६ दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्यांना २८ मार्च रोजी दुपारी २ वाजता न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. म्हणजेच केजरीवालांची होळी तुरुंगातच जाणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR