39.2 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeलातूरनिलंग्याच्या महाराष्ट्र फार्मसीचा प्रेम मुळे राज्यात प्रथम

निलंग्याच्या महाराष्ट्र फार्मसीचा प्रेम मुळे राज्यात प्रथम

निलंगा : प्रतिनिधी
येथील महाराष्ट्र तंत्रनिकेतन डी फार्मसीचा विद्यार्थी प्रेम मुळे याने पुण्यातील इंटर इंजिनीअंिरग डिप्लोमा स्टुडंटस स्पोर्ट्स असोसिएशनने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय अ‍ॅथलेटीक्स चॅम्पीयनशिपमध्ये २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत राज्यात प्रथम येत यश संपादन केले आहे.

प्रेम मुळे २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून १०० मीटर शर्यतीत ते द्वितीय क्रमांक पटकाविला. १४ झोनचे प्रतिनिधीत्व करणा-या २८ खेळाडूंशी स्पर्धा करीत, प्रेम मुळे यांनी ट्रॅकवर उल्लेखनीय वेग आणि कौशल्य दाखवले. २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत, मुळेने अप्रतिम कामगिरी करीत २३.६५ सेकंदात अंतिम रेषा पार करीत विजेतेपद पटकावले. या व्यतिरिक्त, १०० मीटर शर्यतीतील त्याच्या उल्लेखनीय कामगिरीने अ‍ॅथलेटीक्सच्या क्षेत्रातील एक प्रबळ दावेदार म्हणून त्याची स्थिती मजबूत केली.

यावेळी महाविद्यालयात प्रेम मुळे यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीबाबत संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी फार्मसीचे प्राचार्य डॉ भागवत पौळ, प्रा अविनाश मुळदकर, डॉ संजय दुधमल, प्रा विलास कारभारी , डॉ चंद्रकांत ठाकरे, डॉ अमोल घोडके आदि उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ भागवत पौळ म्हणाले की , प्रेम मुळे यांच्या उल्लेखनीय खेळामुळे या क्षेत्रात येणा-या खेळाडूंन्ाां प्रेम आदर्श ठरावा असं कार्य त्यानी केले आहे. मुळे अ‍ॅथलेटीक्सची आवड जोपासत असताना, ते नि:संशयपणे त्यांच्या क्रीडा प्रयत्नांमध्ये अधिक उंची गाठण्याची आकांक्षा बाळगणा-या खेळाडूंसाठी प्रेरणास्थान आहेत, असे महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR