33.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeनांदेडगोदावरी नदीत कोसळली जीप, दोघांना जलसमाधी

गोदावरी नदीत कोसळली जीप, दोघांना जलसमाधी

नांदेड जिल्ह्यात अपघात
नांदेड : प्रतिनिधी
टायर फुटल्याने भरधाव क्रूझर जीप पुलावरून गोदावरी नदीत कोसळल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेत जीपमधील दोघांना जलसमाधी मिळाली. ही दुर्घटना शुक्रवारी सायंकाळी ७ च्या सुमारास येळी-महाटीच्या पुलावर घडली. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. मृतांमध्ये जीपचालक आणखी एका युवकाचा समावेश आहे.

ही क्रूझर जीप शिखाचीवाडी (ता. मुदखेड) येथील असून, शिखाचीवाडी येथील जीपचालक आणि येळी (ता. लोहा) येथील युवक चिलपिंपरी येथे बोळवण सोडून शुक्रवारी सायंकाळी येळीकडे निघाले होते. भरधाव वेगातील ही क्रूझर जीप येळी-महाटीच्या पुलावर आली असता अचानक टायर फुटले आणि जीप पुलावरून गोदावरी नदीत कोसळली. या घटनेचे वृत्त समजताच नजीकच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत व बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेत जीपचालक आणि त्याच्यासोबतच्या युवकाचा मृत्यू झाला. तसेच क्रूझर जीपचेही नुकसान झाले. या दुर्घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR