35.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूरनिलंगा येथे बसवजयंती विविध उपक्रमांनी उत्साहात

निलंगा येथे बसवजयंती विविध उपक्रमांनी उत्साहात

निलंगा :  प्रतिनिधी
समतानायक जगतज्योती, महात्मा बसवेश्वर यांची जयंती शुक्रवारी दि. १० मे रोजी निलंगा येथे विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ८.३० वाजता महात्मा बसवेश्वर वाचनालय, बसवसृष्टी, बसवेश्वर नगर , येथे प्रकाश शेटकार, युवराज बिराजदार, बळवंत देवंगरे, त्र्यंबक स्वामी, शिवाजी रेशमे गुरुजी, सोमनाथ आग्रे , सुरेश सोरडे, इंजिनिअर एम. के. कस्तुरे, श्रीशैल बिराजदार, शेषीकांत पाटील यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वराच्या प्रतिमेचे पूजन करून षटस्थल ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी वैशाली व्हनाळे, संगीता गडवंती, कमलबाई भुसनुरे, सुमनताई डांगे, महानंदा बिराजदार यांनी बसव प्रार्थना, बसव गीत व षटस्थल ध्वजगीताचे गायन केले. त्यानंतर बसवेश्वर नगर येथून शहरातील जिजाऊ चौक, दापकावेस, अशोक नगर, पेठ, बसवेश्वर चौक, आनंदमुनी चौक, डॉ.आंबेडकर पार्क, शिवाजी चौक मार्गे निलंगा एस.टी आगारात दुचाकी रॅलीचा समारोप करण्यात आला. शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास बसव प्रेमी नागरिक व सार्वजनिक बसव जयंती उत्सव समितीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  यावेळी डॉ विक्रम कुडुंबले, राजकुमार चिकराळे, नवनाथ कुडूंबले, धनराज निला, विक्रांत आर्य, राजकुमार निला, शंकराप्पा भुरके, धनराज स्वामी, बसव प्रेमी नागरिक उपस्थित होते.
अशोकनगर निलंगा येथे मठाधिपती संगणबसव महास्वामी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून ध्वजारोहण  करण्यात आले. यावेळी मनोज कोळ्ळे, शिवप्पा भुरके, रत्नेश्वर गताटे, शिवराज फताटे आदी उपस्थित होते. बसवेश्वर मंदिर पेठ येथे सामुहिक ईस्ट ंिलग पूजा, बसव प्रार्थना घेण्यात आली. याप्रसंगी बसवराज बसपुरे, सुर्यकांत पत्रे,ऑडिटर मल्लिकार्जुन बिरादार, एन आर स्वामी गुरुजी, जसवंत आर्य , प्रकाश पटणे, शिवकुमार रुकारे आदी उपस्थित होते. बसवेश्वर चौक येथे अशोक शेटकार, प्रशांत सोरडे, महेश शेटकार, योगेश सोरडे, गुंडाप्पा मंठाळे यांच्या हस्ते बसव फलकास पुष्पहार घालून बसव प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
निलंगा एस टी आगारात सर्व अधिकारी व कर्मचा-यांच्या वतीने बसव जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आगार प्रमुख अनिल बिडवे, लेखा अधिकारी संतोष बिडवे, वाहतूक निरीक्षक सद्धिेश्वर रासुरे, ए डब्ल्यू एस मच्छींद्र कोळी आदीसह  बसव प्रेमी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.  यावेळी डॉ. अरंिवद भातांब्रे , डॉ. मन्मथ गताटे, सोमनाथ आग्रे आदींची  भाषणे झाली. निलंगा एस टी आगारात बसव जयंती उत्सव धुमधडाक्यात साजरी करण्यासाठी बसवेश्वर स्वामी, राजेंद्र बिराजदार, दयानंद मंदाडे ,सुरेश पेद्दे ,संदीप शेटकार, बालाजी कुंभार, सोमनाथ राघो, अनिल तोंडारे, शिवंिलग कोळ्ळे , प्रमोद जीवणे , अजित बिराजदार, विश्वनाथ ठमके, किरण पाटील, मिथुन शेटकार, अनिल बिराजदार, प्रकाश नागाशंकर, आदींनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी बसव जयंती उत्सव समितीच्या वतीने निलंगा आगाराचे उत्पन्न वाढून दोन कोटी रुपये नफा झाल्याबद्दल आगार प्रमुख अनिल बिडवे व इतर अधिका-यांचा सत्कार करण्यात आला. एस टी  आगार येथे महाप्रसादाचे वाटप करून बसव जयंती कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR