गोवंश हत्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

बोरी : जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे गोवंश हत्याबंदी कायद्याचे उल्लंघन करून बेकायदेशीररीत्या गोवंशाची हत्या करून मांस कापले जात असल्याची गोपनीय माहिती मिळताच बोरी पोलिसांनी तातडीने धडक कारवाई केली. या कारवाईत अंदाजे १०० किलो गोवंश जातीचे मांस व इतर साहित्य असा एकूण ३१५०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शेख मोइन अब्दुल करीम (वय ३२), शेख मोसीन अब्दुल करीम (वय २८) रा. कौसडी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. २८ जुलै रोजी सकाळी ७ वाजता कौसडी येथील चांभार गल्ली परिसरातील राहत्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. कारवाई दरम्यान अंदाजे १०० किलो गोवंश जातीचे मांस, दोन सत्तूर, एक धारदार कु-हाड आणि लाकडी खोड असा एकूण ३१५०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत बीट जमादार राजेश जटाळे, पोलिस कर्मचारी अमोल मुंडे, प्रताप साळवणे, संघसेन कांबळे, प्रकाश मोरे आणि फरहीन रंगरेज यांचा सहभाग होता. यापूर्वीही कौसडी परिसरात गोवंश संरक्षण कायद्यांतर्गत झालेल्या कारवायांमध्ये बीट जमादार राजेश जटाळे यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे.

या प्रकरणी पोलिस शिपाई प्रकाश मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाणे बोरी येथे आरोपींविरुद्ध प्राणी छळ प्रतिबंध अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौसडी प्रमाणे बोरीत सुद्धा गोवंश हत्या होत असल्याची चर्चा असून या ठिकाणी कारवाई व्हायला पाहिजे असा सूर नागरिकांमधून व्यक्त येत आहे. पुढील तपास पोलीस हवालदार प्रताप साळवणे करीत आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
02:39:31
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41

Latest news