छ. संभाजीनगरमध्ये छाननी दिवशी इच्छुकांचा राडा

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारीवरून भाजपमध्ये सलग दुस-या दिवशीही मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शेकडो कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील भाजप पक्ष कार्यालयाला घेराव घालत जोरदार राडा केला होता. यावेळी संतापलेल्या इच्छुक उमेदवारांची आमदार केनेकरांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे दिव्या मराठे यांच्यासह इतर काही महिलांनी उपोषणाला सुरुवात केली होती.

राज्यातील २९ महापालिकांसाठी मंगळवारी (३० डिसेंबर) उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेची युती तुटली. त्यानंतर भाजपने इच्छुक उमेदवारांना तिकिट दिले नाही, त्यामुळे शेकडो कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील भाजप कार्यालयाला घेराव घालत जोरदार राडा केला. हा राडा बुधवारी (ता. ३१ डिसेंबर) सुद्धा पाहायला मिळाला. नाराज इच्छुक उमेदवारांपैकी प्रशांत बधाणे पाटील यांनी आत्मदहनाचा सुद्धा प्रयत्न केला. ज्यानंतर भाजप आमदार संजय केनेकर यांनी बधाणे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, काहीही ऐकण्याच्या परिस्थितीत नसलेले बधाणे पाटील यांनी मी कुठे कमी पडलो साहेब? म्हणत केनेकरांसमोर टाहो फोडला. मात्र, पक्षात एकाच वेळेस सर्वांना न्याय देता येत नाही, असे यावेळी केनेकरांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारीवरून भाजपमध्ये सलग दुस-या दिवशीही मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. संतापलेल्या इच्छुक उमेदवारांनी आणि संतप्त कार्यकर्त्यांनी भाजप नेते भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला घेराव घातला, यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करत गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केले. पण कराड आणि सावे या दोन्ही नेत्यांना कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात अपयश आल्यानंतर या ठिकाणी आमदार केनेकरांकडून कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कराड, अतुल सावे यांचे फोटो फाडले
भाजप नेते भागवत कराड आणि अतुल सावे कार्यालयात आले. त्यानंतर पदाधिका-यांनी भागवत कराड आणि अतुल सावे यांच्या गाडीला घेराव घातला व जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी भागवत कराड आणि अतुल सावे यांचे फोटो फाडले, तसेच त्यांच्या गाडीला काळे फासण्याचा प्रयत्न केला. तसेच काही इच्छुक उमेदवारांनी घटनास्थळी गोंधळ घालत अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न देखील केला.

भाजपच्या नाराजांचे उपोषणास्त्र, कार्यालयातच मांडले ठाण
तिकिट वाटपात निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा देखील इशारा दिला होता. मात्र आता कालच्या राड्यानंतर उमेदवारीसाठी इच्छुक असणा-या महिलांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. तिकिट कापल्यामुळे नाराज असणा-या छत्रपती संभाजीनगर प्रभाग क्र. २० गादीया विहारच्या भाजप कार्यकर्त्या दिव्या मराठे या उमेदवारीसाठी इच्छुक होत्या. दिव्या मराठे यांनी याबाबत पक्षश्रेष्ठींना जाब विचारण्यासाठी प्रचार कार्यालय गाठले. यावेळी त्यांनी तिकिट मिळेपर्यंत उपोषणाचा इशारा दिला होता.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Accident|रेणापूर हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण अपघातात मृत्यू
00:44
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
00:00
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
02:08:35
Video thumbnail
Latur Contractar Sucide|कंत्राटदाराच्या मृत्यूचं गूढ डायरीत? ११ जणांवर गुन्हे दाखल!
02:59
Video thumbnail
Latur|“58 पोलिसांवर कारवाई... आता लातूरकरांचा नंबर? 1 सप्टेंबरपासून हेल्मेटसक्तीचा कडक नियम!”
07:09
Video thumbnail
Latur|आई आणि दोन चिमुकले मृत्यूच्या दारातून परतले; नागरिकांनी दाखवलं धाडस
06:02
Video thumbnail
Latur|नियम नसतील तर मनमानी? क्लासेस चालकांना विरोधकांचा सवाल
03:49
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये क्लासेस चालकांचा एल्गार! शासनाच्या प्रस्तावित कायद्याविरोधात आंदोलन
03:03
Video thumbnail
Nanded|आरोपीला घेऊन निघाले पोलिस, वाटेत झाला हल्ला अन् आरोपी झाला पसार!
01:16
Video thumbnail
Nanded|धनगर समाजाचा सरकारला अल्टिमेटम! 17 सप्टेंबरला परभणीत एल्गार
01:53
Video thumbnail
Latur|हेल्मेट सक्तीचा निर्णय आणि व्यापाऱ्यांची ‘एन्ट्री’ थेट नागपूरहून!
05:16
Video thumbnail
Latur|हा रस्ता आहे की तळं? पाहा लातूरच्या मुख्य चौकाची अवस्था
04:09
Video thumbnail
Latur Ground Report|रस्ता की तळं? दमदार पावसानंतर सिद्धेश्वर मंदिरामागील रस्ता पाण्यात!
02:45
Video thumbnail
Nanded| उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी नांदेडमध्ये मराठा आंदोलन! ‘वापस जा’च्या घोषणा
01:58
Video thumbnail
LATUR|पाऊस बरसला... पिकांना नवसंजीवनी; मात्र पाणीटंचाईची चिंता कायम
02:01

Latest news