25.6 C
Latur
Monday, September 23, 2024
Homeलातूरजरांगे-पाटील यांच्या उपोषणाची तातडीने दखल घ्या

जरांगे-पाटील यांच्या उपोषणाची तातडीने दखल घ्या

लातूर : प्रतिनिधी
आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेले मनोज जरांगे-पाटील यांच्या बेमुदत उपोषणाची तातडीने दखल घेवून योग्य तो तोडगा काढावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. मनोज जरांगे-पाटील हे मराठा समाजाला आरक्षण आणि त्याच्याशी निगडीत मागण्यांच्या पूर्ततेसाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे १७ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणास बसले आहेत. या पार्श्वभूमीवर लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे.
मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या तब्येतीची तातडीने राज्य सरकारने दखल घेणे गरजेचे आहे. समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरु असलेल्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याने समाजात नाराजीचे वातावरण आहे. त्यातूनच बीड, धाराशिव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने बंद पुकारण्यात आला. त्यानंतर लातूरमध्येही बंद पुकारण्यात आला आहे. म्हणून सरकारने मनोज जरांगे-पाटील यांच्याशी बोलणी करुन लवकरात लवकर तोडगा काढायला हवा आणि समाजाला न्याय द्यायला हवा, अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR