जिंतूरमध्ये मतदार याद्या विशेष सखोल पुनरिक्षण कामाला वेग

जिंतूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाला जिंतूर तालुक्यात वेग आला आहे. या प्रक्रियेंतर्गत तालुक्यातील १,०१७ विसंगती असलेले आणि १,८४५ नकाशीकरण न झालेले असे एकूण २,८६२ मतदार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या मतदारांची नियमानुसार सुनावणी घेण्यात येणार आहे.

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २० जून ते ४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिंतूर तालुक्यातील मतदार याद्यांची तपासणी व आवश्यक प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. जिंतूर तालुक्यातील संबंधित मतदारांना सहाय्यक मतदार नोंदणी अधिका-यांमार्फत सुनावणीच्या नोटिसा देण्यात येणार आहेत.

२८, २९, ३० सप्टेंबर तसेच १ ऑक्टोबर या कालावधीत जिंतूर शहर व जिंतूर ग्रामीण भागातील मतदान केंद्रनिहाय मतदारांची सुनावणी निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणी घेण्यात येणार आहे.जिंतूर शहर व ग्रामीण भागासाठी एकूण १५ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत प्राप्त होणारे दावे व हरकती याबाबत संबंधित मतदारांना सहाय्यक मतदार नोंदणी अधिका-यांमार्फत नोटिस देण्यात येणार असून, त्यांचा नियमानुसार निपटारा करण्यात येणार आहे.

अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबरला प्रसिध्द होणार
विशेष सखोल पुनरिक्षणाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कळविण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या नावाची व इतर नोंदींची माहिती तपासून घ्यावी. सुनावणीची नोटीस प्राप्त झाल्यास निर्धारित दिवशी आवश्यक पुराव्यांसह संबंधित अधिका-यांंसमोर उपस्थित राहावे. दावा किंवा हरकत असल्यास निर्धारित कालावधीत ती नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नागरिकांना प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन
जिंतूर तालुक्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षणाचे काम उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार जिंतूर श्रीमती शितल कच्छवे, नायब तहसीलदार (निवडणूक) सुग्रीव मुंढे यांच्या माध्यमातून संबंधित प्रशासकीय कार्यवाही करण्यात येत आहे. मतदारांच्या सुनावण्या, दावे व हरकतींचा निपटारा, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेत नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करून आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातुरात झाडातून अवतरले गणराय; अनोख्या देखाव्याने वेधलं लक्ष!
04:37
Video thumbnail
🔴 LIVE - एकमत कार्यालयातील गणरायाची आरती |EKMAT DIGITAL
12:45
Video thumbnail
Latur| डुप्लिकेट आमदारांना सांभाळू नका; देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावर अभय साळुंके थेट बोलले
08:03
Video thumbnail
Latur|लातूर-तुळजापूर महामार्गावर राष्ट्रवादीचा रास्ता रोको
03:13
Video thumbnail
Latur|नानिकभाई जोधवानी यांच्या हस्ते एकमत कार्यालयातील गणरायाची आरती संपन्न
05:07
Video thumbnail
Latur|मोईजभाई शेख यांच्या आठवणींना काँग्रेस नेत्यांकडून उजाळा
05:40
Video thumbnail
Latur|लक्ष्मण ढोबळेंच्या वक्तव्याविरोधात महिलांचा संताप
02:00
Video thumbnail
Latur|महादेव उबाळे यांच्या हस्ते एकमत कार्यालयातील आरती संपन्न
08:58
Video thumbnail
🔴 LIVE - एकमत कार्यालयातील गणरायाची आरती |EKMAT DIGITAL
12:44
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये सफाई कामगारांचा ‘झाडू मोर्चा’; ईपीएफची रक्कम देण्याची मागणी
02:02
Video thumbnail
Latur|शासन निर्णयाची होळी! ग्रामरोजगार सहाय्यकांचा थेट इशारा
03:28
Video thumbnail
Latur|तुटपुंजी मदत नको! शेतकऱ्यांना भरीव मदतीची मागणी
06:34
Video thumbnail
Latur| देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर शेतकऱ्यांनी थेटच बोलले
10:40
Video thumbnail
CM Devendra Fadanvis|दोन दिवसांत जीआर! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा
05:52
Video thumbnail
🔴 LIVE मुख्यमंत्री फडणवीस आज लातूर दौऱ्यावर; शेतकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया| Ekmat Digital
12:19

Latest news