जिल्ह्यात पाहणी अहवालावरच मिळणार मदत

लातूर : विनोद उगीले
सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी जिल्हाधिकारी लातूर यांनी वेगवेळ्या तीन तालुकास्तरीय समितीचे गठण करून सदरील नुकसानीचे पंचनामे १४ ऑक्टोंबरपर्यंत पुर्ण करून त्याचा सविस्तर अहवाल १५ ऑक्टोंबर रोजी पाठवण्याचे आदेश दिले होते. मात्र या गठित समितीतील अधिका-यांचा अजून ही एकमेकाशी मेळ जुळून आला नसल्याने त्यांना अतिवृष्टीग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी मुर्हुतच सापडला नसल्याने व ते जाय मोक्यावर पंचनाम्यासाठी आले नसल्याचे बाधित शेतक-यांतून बोलेले जात आहे. तर जिल्ह्यात प्रत्यक्षात मात्र अतिवृष्टीग्रस्ताना मदतीची बोळवण प्रत्यक्ष पंचनाम्यावर नाही तर प्राथमिक पाहणी अहवालावर मिळणार आहे.
जिल्ह्यात माहे सप्टेंबर २०२५ मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणात जमिनी खरडून गेलेल्या असून जमिनींवर गाळ साचलेला आहे. तसेच शेतकन्यांच्या विहिरीचे नुकसान झाले आहे. त्याकरीता जिल्ह्यामध्ये उक्त बाबीचा पंचनामा करण्यासाठी सुसूत्रता यावी व विहित कालावधी अचूक व वस्तुनिष्ठ पंचनामे होण्यासाठी जिल्हाधिकारी लातूर यांनी दि. ८ ऑक्टोंबर रोजी तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी यांची वेगवेगळे तीन पथके तयार करून या पथकांतील अधिकारी, कर्मचारी यांनी उक्त बाबींचे झालेल्या नुकसानीचे जायमोक्यावर जावून प्रत्यक्षमध्ये फोटो काढून ते जतन करून ठेवावेत व त्यानुसार नुकसानीचे पंचनामे दि. १४ ऑक्टोंबरपर्यंत पूर्ण करून तहसिलदार यांना संयुक्त स्वाक्षरीचा अहवाल सादर करण्यात यावा तर तहसिलदार यांनी उक्त बार्बीच्या नुकसानीचा अंतिम अहवाल या कार्यालयास तालुकास्तरीय समितीच्या स्वाक्षरीचा दि. १५ ऑक्टोंबर रोजी सादर करावा असे आदेश दिले होते.
जिल्हाधिकारी यांनी गठित कलेल्या या समितीत शेतीपिकाच्या नुकसानीचे पंचनामे व याद्या तयार करणे या बाबीच्या पथकात पथक प्रमुख म्हणून मंडळ अधिकारी महसूल व सहाय्यक अधिकारी, कर्मचारी म्हणून ग्राम महसूल अधिकारी व नियंत्रण अधिकारी म्हणून तहसिलदार यांची नेमणूक केली आहे. तर जमीन खरडून जाणे, तसेच विहिर पडझड व गाळ साचून नुकसान झालेल्या बाबीच्या पथकात मंडळ अधिकारी कृषी विभाग यांची पथक प्रमुख्र म्हणून तर सहाय्यक अधिकारी कर्मचारी म्हणून कृषी सहाय्यक, भूकरमापक व शाखा अभियंता मृद व जलसंधारण विभाग तर नियंत्रक अधिकारी म्हणून तालुका कृषी अधिकारी यांची नेमणूक केली आहे. तर घरपडझड व घरात पाणी घुसून   झाालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या बाबीच्या पथकात विस्तार अधिकारी (पंचायत) तर सहाय्यक अधिकारी कर्मचारी म्हणून ग्रमसेवक, ग्रामविकास अधिकारी  व नियंत्रक अधिकार म्हणून गटविकास अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - धाराशिव
02:10:21
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत- सोलापूर
02:13:30
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35

Latest news