चाकूर : प्रतिनिधी
चाकूर शहरातील सध्या प्रत्येक मतदारांचे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून विशेष पुननिरीक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. चाकूर शहरातील भाग क्रमांक २८९ मधील शेख हुसेन रज्जाक या नावाने २००२ मध्ये म्ॅपिंग झाली होती. मतदार गणना फार्म भरण्यासाठी गेले असता. सदरील नाव यादीत दाखवतच नव्हते. तेव्हा बीएलओकडे चौकशी केली असता तुमचे नाव डिलीट (मयत) यादीत दाखवत असल्याचे सांगण्यात आले त्यामुळे आपला मन:स्ताप झाल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष हुसेन शेख यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
हा प्रकार पाहून शेख म्हणाले की, मयत यादीत नाव आले असे समजल्यानंतर मनस्ताप झाला. तहसिल कार्यालयातील निवडणूक विभागात जाऊन माहिती घेतली असता. माझे नाव २००२ यादीत नाव समाविष्ट असून मॅपिंग झाले आहे. शहरातील भाग क्रमांक २८९ मध्ये माझ्या कुटुंबातील पत्नी, मुलगा, मुलगी, माझे भाऊ, पुतने यांचे नावे यादीत समाविष्ट आहेत पण माझेच नाव कमी झाले आहे. मी १९९५ पासून चाकूर शहरातील भाग क्रमांक १७२ मध्ये अनुक्रमांक १४४५ असून सध्याच्या भाग क्रमांक २८९ मध्ये मतदान क्रमांक एनजीएफ २४१३२७६ हा आहे. आपण राष्ट्रीय पक्षाचा पदाधिकारी असल्याचा उल्लेख करीत, राजकीय हेतूने मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
न्याय न मिळाल्यास २८ जुलैपासून उपोषण
दि. २८ जुलै २०२६ पर्यंत न्याय न मिळाल्यास तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा शेख यांनी दिला आहे. आपण मधुमेह व उच्च रक्तदाबाचे रुग्ण असल्याचे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष हूसेन शेख यांनी सांगितले आहे.
















