‘जेन झी’ने सरकारचा झिंज्या उपटल्या; ठाकरे बंधूंचा हल्लाबोल, मुंबईतील उद्याचा मोर्चा होणारच! 

मुंबई : देशातील तरुण पिढीने अर्थात ‘जेन झी’ने आपल्या सनदशीर आंदोलनाच्या जोरावर केंद्र सरकारचा मस्तवालपणा उतरवला आहे. ‘जेन झी’ झीने सरकारची मस्ती जिरवली आहे आणि त्यांच्या झिंज्या उपटल्या आहेत. या विद्यार्थ्यांनी अख्ख्या देशाला भयाने पछाडलेल्या जाळ्यातून बाहेर काढले असून, देशात युवाशक्ती एकत्र आल्यास ती काय करू शकते, याची ही फक्त एक झलक आहे, अशा शब्दांत शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (आज दि. २५) संयुक्­त पत्रकार परिषदेत जंतर मंतरवर सुरु असर्णा­या विद्­यार्थी आंदोलनांचे कौतूक केले. तसेच, उद्या शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा मोर्चा निघणारच, असेही त्­यांनी यावेळी स्­पष्­ट केले.

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, भाजप सरकारने देशात असा भ्रम निर्माण केला होता की, देशात आता नागरिक उरलेलेच नाहीत, ती केवळ झुरळे आहेत. परंतु, या एका ‘झुरळाने’ (सामान्य विद्यार्थ्याने) हुकूमशाही सरकारला झुकवून दाखवले आहे. हा विषय केवळ एका राजीनाम्यापुरता मर्यादित नव्हता. या ऐतिहासिक आंदोलनाचे नेतृत्व करणा-या अभिजित दिपके यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. आंदोलन मागे घेतलेले नाही!

अभिजित दिपके यांनी आंदोलन मागे घेतलेले नाही. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मुख्य मागणी मान्य झाली असली, तरी विद्यार्थ्यांच्या आणखी दोन महत्त्वाच्या मागण्या अद्याप बाकी आहेत. त्या मान्य होणे अत्यंत आवश्यक आहे, असे ठाकरे यांनी स्­पष्­ट केले.

विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणार का?
आंदोलनादरम्यान घडलेल्या प्रकारावर ताशेरे ओढताना उद्धव ठाकरे यांनी गृह मंत्रालयावर गंभीर आरोप केले. विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनात साध्या वेषातील गुंड घुसवण्यात आले होते. आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलीस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आता स्पष्ट खुलासा करावा की, या निष्पाप विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेतले जाणार आहेत का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

सरकारची मस्ती जिरवली : राज ठाकरे
झेन झीने सरकारची मस्ती जिरवली आहे आणि त्यांच्या झिंज्या उपटल्या आहेत, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलक तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.दरम्यान, राज्यातील राजकीय घडामोडींवर बोलताना त्यांनी मुख्यमंर्त्यांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री फडणवीस अचानक दिल्लीला का गेले, हे मला माहित नाही. त्याबाबतचा खुलासा त्यांनी स्वत:च करायला हवा, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

उद्याचा मोर्चा निश्चित!
केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आणि विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी उद्याचा नियोजित मोर्चा वेळेवरच निघणार असल्याचे स्पष्ट करत दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्कपासून ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत हा भव्य मोर्चा काढला जाणार असून, त्यात नागरिकांनी आणि तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची घोषणा? परभणीत आंदोलकांचा जल्लोष!
02:47
Video thumbnail
Latur|माळरानावर फुलवलं नंदनवन! निवृत्त पोलिसाची शेती पाहून तुम्हीही थक्क व्हाल
03:43
Video thumbnail
Latur|सोमवारी लातूरमध्ये महामोर्चा; आरक्षण उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाचा एल्गार!
04:30
Video thumbnail
Dharmendra Pradhan|NEET पेपरफुटीचा मोठा परिणाम? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा!
01:30
Video thumbnail
Latur|विठ्ठलनामाच्या गजरात महिला वारकऱ्यांची पायी वारी; शिवणी ते झळकवाडी भक्तिमय सोहळा!
00:42
Video thumbnail
'प्रति पंढरपूर' वांजरवाड्यात आषाढी एकादशीनिमित्त जनसागर; दर्शनासाठी अर्धा किलोमीटरच्या रांगा
03:23
Video thumbnail
"26 दिवस उपोषणानंतरही माझी प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार?" – सोनम वांगचुक यांचा संतप्त सवाल
03:11
Video thumbnail
Amit Deshmukh|सरकारनं चर्चेला उशीर केला; देशाचे सगळे स्तंभ ढासळतायत - आ.अमित देशमुख
04:59
Video thumbnail
Latur|NEET पेपरफुटी आणि लाठीचार्जविरोधात विद्यार्थ्यांचा ‘रॅप सॉंग’ आंदोलन
02:21
Video thumbnail
Latur|क्षयरोगमुक्त गावासाठी मोठी मोहीम; वडवळ नागनाथमध्ये विशेष निक्षय शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|विठुरायाच्या दर्शनासाठी १२०० भाविकांची मोफत वारी; २५ बसने पंढरपूरकडे रवाना!
02:11
Video thumbnail
Latur|लातुरात विद्यार्थ्यांची भक्तिमय दिंडी; पाहा आनंदवारीचा जल्लोष!
04:04
Video thumbnail
PM Narendra Modi On NEET Pepar Leak|नीट पेपर फुटी प्रकरणात नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया
02:56
Video thumbnail
दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ पूर्णा बंद; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
06:32
Video thumbnail
Parbhani|लाठीहल्ल्याचा निषेध, परभणी बंद; बाजारपेठेत शुकशुकाट!
02:08

Latest news