१६ वर्षांखालील मुलांसाठी पोस्ट, कमेंट, लाईकवर बंदी?

हनोई : वृत्तसंस्था
सोशल मीडियावर मुलांकडून होणा-या मनमानी वापराला आळा घालण्याची तयारी जगभरात सुरू झाली आहे. आता १६ वर्षांखालील मुले आणि किशोरवयीन मुले सोशल मीडियावर पोस्ट, रिपोस्ट, लाईक आदी गोष्टी करू शकणार नाहीत. तसेच मुलांनी सोशल मीडिया अकाऊंट तयार करण्याच्या नियमांमध्येही बदल करण्यात येणार आहेत. व्हिएतनाम सरकारने हा नियम आणण्याची तयारी केली आहे.

सोशल मीडियाचा मनमानी पद्धतीने वापर करणा-या मुलांवर आता निर्बंध येण्याची शक्यता आहे. व्हिएतनाम सोशल मीडिया वापराबाबतच्या नियमांमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे. सरकार सोशल मीडिया वापरणा-या मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, व्हिएतनाम सरकार यासंदर्भातील एका आदेशाचा मसुदा तयार करत आहे.
या प्रस्तावित नवीन नियमांनुसार, १६ वर्षांखालील मुले सोशल मीडियावर पोस्ट करू शकणार नाहीत. तसेच इतरांच्या पोस्टवर कमेंट, लाईक किंवा अशा प्रकारच्या इतर प्रतिक्रिया देण्यावरही निर्बंध असतील.
या नियमांच्या तयारीसह व्हिएतनाम अशा देशांच्या यादीत सामील झाला आहे, जे १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध आणण्याच्या दिशेने पावले उचलत आहेत. ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच देशात मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी लागू केली आहे.

पालकांच्या परवानगीनंतरच सोशल मीडिया वापरता येणार
व्हिएतनामने प्रस्तावित केलेल्या नियमांनुसार, १६ वर्षांखालील किशोरवयीन मुलांना पालक किंवा पालकत्वाची जबाबदारी असलेल्या व्यक्तीच्या माहितीच्या आधारे सोशल मीडिया अकाऊंट रजिस्टर करता येणार आहे. मुलांनी कोणत्या प्रकारचा कंटेंट पाहावा आणि ते सोशल मीडियावर किती वेळ घालवतात, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पालकांची असेल.

सोशल मीडिया कंपन्यांचीही जबाबदारी
व्हिएतनाम सरकारने तयार केलेल्या मसुद्यानुसार, सोशल मीडिया कंपन्यांचीही महत्त्वाची जबाबदारी असेल. कंपन्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वापरकर्त्यांचे वय ओळखावे लागेल आणि मुलांना त्यांच्या वयानुसार योग्य कंटेंटच दाखवला जात आहे, याची खात्री करावी लागेल.

मुलांच्या गोपनीयतेचीही घ्यावी लागणार काळजी
व्हिएतनामच्या प्रस्तावित मसुद्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना मुलांच्या अकाऊंटसाठी उच्च पातळीची प्रायव्हसी आणि सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत. तसेच हिंसा, अश्लीलता, जुगार, आत्महत्येशी संबंधित किंवा इतर हानिकारक कंटेंट ओळखून तो ब्लॉक करण्यासाठी आवश्यक पावले उचलावी लागतील.
ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर फ्रान्सनेही १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध आणण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. ऑस्ट्रेलिया हा अशा प्रकारचा निर्बंध लागू करणारा पहिला देश ठरला असून, आता अनेक देश या दिशेने पुढे जात आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची घोषणा? परभणीत आंदोलकांचा जल्लोष!
02:47
Video thumbnail
Latur|माळरानावर फुलवलं नंदनवन! निवृत्त पोलिसाची शेती पाहून तुम्हीही थक्क व्हाल
03:43
Video thumbnail
Latur|सोमवारी लातूरमध्ये महामोर्चा; आरक्षण उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाचा एल्गार!
04:30
Video thumbnail
Dharmendra Pradhan|NEET पेपरफुटीचा मोठा परिणाम? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा!
01:30
Video thumbnail
Latur|विठ्ठलनामाच्या गजरात महिला वारकऱ्यांची पायी वारी; शिवणी ते झळकवाडी भक्तिमय सोहळा!
00:42
Video thumbnail
'प्रति पंढरपूर' वांजरवाड्यात आषाढी एकादशीनिमित्त जनसागर; दर्शनासाठी अर्धा किलोमीटरच्या रांगा
03:23
Video thumbnail
"26 दिवस उपोषणानंतरही माझी प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार?" – सोनम वांगचुक यांचा संतप्त सवाल
03:11
Video thumbnail
Amit Deshmukh|सरकारनं चर्चेला उशीर केला; देशाचे सगळे स्तंभ ढासळतायत - आ.अमित देशमुख
04:59
Video thumbnail
Latur|NEET पेपरफुटी आणि लाठीचार्जविरोधात विद्यार्थ्यांचा ‘रॅप सॉंग’ आंदोलन
02:21
Video thumbnail
Latur|क्षयरोगमुक्त गावासाठी मोठी मोहीम; वडवळ नागनाथमध्ये विशेष निक्षय शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|विठुरायाच्या दर्शनासाठी १२०० भाविकांची मोफत वारी; २५ बसने पंढरपूरकडे रवाना!
02:11
Video thumbnail
Latur|लातुरात विद्यार्थ्यांची भक्तिमय दिंडी; पाहा आनंदवारीचा जल्लोष!
04:04
Video thumbnail
PM Narendra Modi On NEET Pepar Leak|नीट पेपर फुटी प्रकरणात नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया
02:56
Video thumbnail
दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ पूर्णा बंद; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
06:32
Video thumbnail
Parbhani|लाठीहल्ल्याचा निषेध, परभणी बंद; बाजारपेठेत शुकशुकाट!
02:08

Latest news