26.4 C
Latur
Friday, October 31, 2025
Homeमहाराष्ट्रतात्काळ ई-केवायसी करा अन्यथा लाभ होणार बंद

तात्काळ ई-केवायसी करा अन्यथा लाभ होणार बंद

लाडकी बहीण योजनेसंबंधी आदिती तटकरे यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंत लाखो महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली असून उर्वरित लाभार्थी भगिनींनीही १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते, असे आदिती तटकरे म्हणाल्या.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेदरम्यान, अनेक फसवणुकीचे प्रकार समोर आले. यानंतर राज्य सरकारकडून योग्य ती खबरदारी घेत पडताळणी सुरू केली आहे. याचदरम्यान आता लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार आता लाडक्या बहि­णींना दरवर्षी केवायसी करावी लागणार आहे.

केवायसी प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत २९ ऑक्टोबर रोजी मंत्रालयात बैठक घेतली. दिनांक १८ सप्टेंबर २०२५ पासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ई- केवायसी सुविधा उपलब्ध आहे. यासाठी २ महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे.

उर्वरित लाभार्थी भगिनींनीही १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते, असं आदिती तटकरे म्हणाल्या.

सर्व पात्र महिलांना ई केवायसी करताना काही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होते, मात्र आता लाडक्या बहिणींच्या ई केवायसी सर्व्हरमध्ये सुधारणा करण्यात आल्याने पुढील काही दिवसांत ई-केवायसी करण्याचे आवाहन मंत्री आदिती तटकरेंनी केले आहे. तसेच ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR