दंत चिकित्सेत आधुनिक तंत्रज्ञानासोबत सेवाभाव आवश्यक

लातूर : प्रतिनिधी
दंतचिकित्सा क्षेत्रात आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनाला मानवी संवेदनशीलतेची जोड देणे आवश्यक आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान हे उपचार अधिक अचूक आणि प्रभावी करण्याचे साधन आहे; मात्र रुग्णाचा विश्वास, करुणा आणि सेवाभाव हे दंतचिकित्सेचे मूलभूत आधार आहेत, असे प्रतिपादन माईर एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड यांनी केले.
एमआयडीएसआर दंत महाविद्यालय, लातूर येथे आयोजित ‘दंतवेदांता २०२६’ या परिषदेत डॉ. कराड बोलत होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. यतीशकुमार जोशी, संस्थात्मक विकास अधिकारी डॉ. कैलास शेळके, डॉ. ओम बघेले, डॉ. विजयलक्ष्मी माले व डॉ. गौरी उगले यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘विज्ञान आणि अध्यात्माच्या साहाय्याने हास्यात सुसंवाद साधणे’ या बोधवाक्याखाली आयोजित करण्यात आलेल्या या दुस-या राज्यस्तरीय परिषदेत राज्यातील विविध भागांतून दंतचिकित्सक, प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थी सहभागी झाले.
‘विज्ञान आपल्याला काय करायचे आणि कसे करायचे हे शिकवते; तर अध्यात्म आपण हे का करीत आहोत, याची जाणीव करून देते. ज्ञानाला करुणेची जोड मिळाली तरच आरोग्य सेवा ख-या अर्थाने अर्थपूर्ण ठरते.’ दंतचिकित्सकांनी केवळ रुग्णाच्या दातांवर उपचार न करता त्याची भीती, चिंता आणि मानसिकता समजून घेत संवेदनशीलतेने उपचार करण्याची गरज असल्याचे सांगून डॉ. कराड म्हणाले, आधुनिक काळात डिजिटल दंतचिकित्सा, कृत्रिम बुद्धिमत्ता, अत्याधुनिक निदान पद्धती, इम्प्लांटोलॉजी तसेच विविध आधुनिक तंत्रज्ञानामुळे दंतचिकित्सा क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. या बदलांचा स्वीकार करताना दंतचिकित्सकांनी सातत्याने नवे ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करावे. दंतआरोग्याबाबत जनजागृती आणि प्रतिबंधात्मक दंतचिकित्सेवर भर देण्याची गरज व्यक्त करताना डॉ. कराड यांनी दंतचिकित्सेतील आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच लूप्स, मायक्रोस्कोप आणि आधुनिक साधनांचा वापर करण्याची सवय लावून घ्यावी. यामुळे उपचारातील अचूकता आणि कौशल्य वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी डॉ. शेळके यांनी दंतचिकित्सा क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराचे महत्त्व अधोरेखित केले. निदानातील अचूकता आणि उपचारांमधील सुस्पष्टता वाढविण्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण ठरत असून, भविष्यात स्टेम सेल्स, रीजनेरेटिव्ह डेंटिस्ट्री आणि प्रिव्हेंटिव्ह डेंटिस्ट्री या क्षेत्रांमध्ये संशोधनाला मोठी संधी आहे, असे त्यांनी सांगितले. ‘इम्प्लांटॉलॉजी’नंतर आता ‘व्हॉट नेक्स्ट?’ या प्रश्नाचा शोध घेत पुढील पिढीतील दंतचिकित्सकांनी नव्या संशोधन क्षेत्रात पुढाकार घ्यावा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गौरी उगले यांनी केले. सूत्रसंचालन सृष्टी पाटील व विष्णुप्रिया मालू यांनी केले, तर डॉ. तृप्ती गिरी यांनी आभार मानले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40

Latest news