23.4 C
Latur
Friday, February 6, 2026
Homeमहाराष्ट्रदहिसर पश्चिममध्ये निवडणूक प्रचारादरम्यान हिंसाचार

दहिसर पश्चिममध्ये निवडणूक प्रचारादरम्यान हिंसाचार

  घरात प्रचारास विरोध केल्याने नागरिकांना मारहाण; कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : प्रतिनिधी
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला उधाण आले असताना दहिसर पश्चिम भागात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीमुळे खळबळ उडाली आहे. घरात प्रचार करण्यास विरोध केला म्हणून दोन नागरिकांना बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना काल संध्याकाळी दहिसर प्रभाग क्रमांक १ मध्ये घडली. ही घटना शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार रेखा राम यादव यांच्या प्रचारादरम्यान घडली असून, दहिसर पश्चिम येथील विठ्ठलवाडी सोसायटी परिसरात प्रचार फेरी सुरू असताना हा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाचे ८ ते १० कार्यकर्ते प्रचार करत एका घरात गेले असता त्या घरातील नागरिकांनी घरात प्रचार नको, असा विरोध केला. याचाच राग आल्याने प्रचार करणारे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी त्या घरातील दोन व्यक्तींना लाथा-बुक्क्यांनी तसेच पक्षाच्या झेंड्यांनी बेदम मारहाण केली.

या संपूर्ण घटनेचे व्हीडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, त्यामध्ये कार्यकर्त्यांची दादागिरी आणि मारहाण स्पष्टपणे दिसून येत आहे. व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात तसेच स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी मध्यरात्री पोलिस स्टेशनमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या ९ ते १० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली आहे.
दरम्यान, निवडणूक प्रचाराच्या काळातच अशा प्रकारची गुंडगिरी समोर आल्यामुळे दहिसर परिसरात मोठा राजकीय तणाव निर्माण झाला आहे. शांततापूर्ण प्रचाराची अपेक्षा असताना कार्यकर्त्यांच्या हिंसक वर्तनामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR