दादांच्या अपघाताचा रिपोर्ट नाही, आमचा संयम संपतोय; युगेंद्र पवार संतापले!

बारामती : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताला सहा महिने पूर्ण होऊनही तपासाचा अंतिम निष्कर्ष समोर न आल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तपास यंत्रणांनी विलंब न करता अहवाल प्रसिद्ध करून अपघाताच्या दिवशी नेमकं काय घडलं, हे जनतेसमोर मांडावं, अशी मागणी त्यांनी केली.

अजित पवार यांच्या अपघाती निधनाला सहा महिने पूर्ण झाल्याच्या निमित्ताने युगेंद्र पवार यांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठान परिसरातील अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना युगेंद्र पवार यांनी अपघात प्रकरणाच्या तपासाच्या गतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

दादांना जाऊन सहा महिने झाले, मात्र चौकशीतून अद्याप कोणतेही ठोस उत्तर मिळालेले नाही. अनेकजण या विषयावर बोलतात; पण प्रत्यक्षात काहीही पुढे सरकत नसल्याचं दिसतं. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, असे युगेंद्र पवार म्हणाले. अपघातानंतर सुरक्षेच्या दृष्टीने अपेक्षित उपाययोजनाही पूर्ण झालेल्या नसल्याचा आरोप त्यांनी केला.

साधे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे कामही पूर्ण झालेले नाही. सीआयडी आणि डीजीसीएकडून तपास सुरू असल्याचे सांगितले जाते; परंतु अद्याप अंतिम अहवाल समोर आलेला नाही, असे त्यांनी नमूद केले. पुढे त्यांनी सांगितले, ‘कारवाई होत नाही, चौकशीचा निष्कर्षही जाहीर होत नाही. आम्ही सहा महिने संयमाने वाट पाहिली. आता मात्र त्या दिवशी नेमके काय घडले, याचे स्पष्ट उत्तर मिळणे आवश्यक आहे. संबंधित यंत्रणांनी दुसरा अहवाल तातडीने प्रसिद्ध करावा’, अशी मागणीही युगेंद्र यांनी केली आहे.

सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यादेखील आपल्या भावाच्या आठवणीत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार यांच्या निधनाला सहा महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दादा, तुझ्यासोबतच्या आठवणी मनात कायम जिवंत आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|हळदीला कमी भाव; संतप्त शेतकऱ्यांनी लिलावच बंद पाडला!
05:14
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये मनपाचा बुलडोझर मोड! एका दिवसात ₹94,600 दंड वसूल
01:44
Video thumbnail
Latur|२ ऑगस्टला दशनाम गोसावी समाजाचा पंचसूत्री कार्यक्रम
04:43
Video thumbnail
Nanded|दोन लाखांची कर्जमाफी कुठे गेली?' शेतकऱ्यांचा सरकारला थेट सवाल!
03:35
Video thumbnail
Nanded|'हवी ती चौकशी करा'; पेपरफुटीचे आरोप नेरलकरांनी धुडकावले
02:35
Video thumbnail
Nanded|MH-CET पेपरही फुटला? 99 पर्सेंटाइलवरून काँग्रेसचा मोठा आरोप!
02:16
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये चोरट्यांचा धडाका! एका रात्रीत सलग चार दुकाने फोडली
01:52
Video thumbnail
८ ऑगस्ट रोजी अकलूजमध्ये महिलांसाठी मोफत कॅन्सर निदान व तपासणी शिबिर
13:50
Video thumbnail
Solapur|उजनी धरण 100 टक्के भरले; भीमा नदीत विसर्ग सुरू
00:23
Video thumbnail
Nanded|हिमायतनगर शहरात घाणीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप!
08:31
Video thumbnail
Latur|१ ऑगस्टपर्यंत आरक्षण उपवर्गीकरण जाहीर करा; मातंग समाजाचा इशारा
05:28
Video thumbnail
Latur|किड्स इन्फो पार्कजवळ एसटी आणि स्कूल बसचा अपघात; काही जण किरकोळ जखमी!
00:40
Video thumbnail
Latur|वाहतूक कोंडीला ब्रेक लावण्यासाठी लातुरात मोठा ड्राइव्ह; अतिक्रमणावर कारवाई सुरू!
02:58
Video thumbnail
Nanded|डिजिटल अरेस्टच्या नावाने सायबर ठगांचा नवा डाव; नांदेडमध्ये ५१ लाखांची फसवणूक
03:31
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या मुद्द्यावर नगरसेवकही रस्त्यावर; महामोर्चात सक्रिय सहभाग!
03:13

Latest news