दुबार मतदारांची एसआयआर प्रक्रियेत नावे वगळा; पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

सातारा : कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील यादीमध्ये ५६ हजारहून अधिक दुबार, स्थलांतरित आणि संशयित मतदारांच्या नोंदी असल्याचा गंभीर मुद्दा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. मतदार यादीची अचूकता, पारदर्शकता आणि त्रुटीरहितपणा हा मुक्त, निष्पक्ष व विश्वासार्ह निवडणूक प्रक्रियेचा मूलभूत आधार असल्याने विशेष मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेत दुबार आणि बोगस मतदारांची नावे वगळण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

यासंदर्भात पृथ्वीराज चव्हाण यांच्या वतीने सातारा जिल्हा काँग्रेसने जिल्हाधिका-यांना निवेदन दिलं आहे.२०२ ४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी वेळोवेळी लेखी स्वरूपात दुबार मतदारांची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली होती. मात्र, त्यावर अपेक्षित कार्यवाही न झाल्याने दुबार आणि बोगस मतदारांचा प्रश्न कायम असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

मतदारांची आकडेवारी केली सादर: पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिणमधील मतदार यादीचे संगणकीय विश्लेषण केलं आहे. त्यानुसार २१ हजार १३२ मतदारांच्या नावांची तब्बल ४८ हजार ७४१ वेळा नोंद आढळून आली आहे. त्यामुळे सुमारे २७ हजार ६०९ दुबार नोंदी असण्याची शक्यता आहे. याशिवाय कराड दक्षिणला लागून असलेल्या कराड उत्तर, इस्लामपूर, शिराळा, पाटण आणि पलूस-कडेगाव या पाच विधानसभा मतदारसंघांतील २८ हजार ५०९ मतदारांची नावे कराड दक्षिणच्या मतदार यादीत असल्याचा संशय आहे. या सर्व नोंदींची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दुबार मतदार नावे वगळावीत
मतदाराचे नाव, मतदान केंद्र, भाग क्रमांक आणि अनुक्रमांकासह कराड दक्षिणच्या मतदार यादीतील एकूण ५६ हजार ११८ संशयित दुबार अथवा स्थलांतरित नोंदींची सविस्तर यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पृथ्वीराज चव्हाण यांनी सादर केली आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेत सर्व दुबार, स्थलांतरित व संशयित नोंदींची सखोल पडताळणी करून नियमबा व अपात्र नावे नव्या मतदार यादीतून वगळावीत, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.

कार्यवाहीची सविस्तर माहिती द्या
विधानसभा निवडणुकीच्या अगोदर २८ ऑगस्ट, ९ सप्टेंबर आणि १६ सप्टेंबर २०२४ रोजी यासंदर्भात निवेदने दिली होती. त्यावर निवडणूक आयोगाने कोणती कार्यवाही केली, त्याची सविस्तर माहिती देण्याची मागणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी निवेदनात केली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूर हादरलं!उड्डाण पुलावरून थेट खाली कोसळले दोन तरुण
02:39
Video thumbnail
Nanded|किनवट हादरलं! पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा १२ तासांनंतरही शोध नाही
01:16
Video thumbnail
Latur|एसटी आरक्षणासाठी धनगर समाज पुन्हा आक्रमक; काळ्या फिती लावून आंदोलन!
01:17
Video thumbnail
Latur|पहिल्याच पावसात मनपाची पोलखोल; नालीचे घाण पाणी थेट रस्त्यावर!
02:22
Video thumbnail
Latur|पाणीपुरवठ्याबाबत चिंता करण्याचे कारण नाही – जिल्हाधिकारी
03:01
Video thumbnail
Latur|हैदराबाद-विजयवाडा अभ्यास दौऱ्यावर 27 नगरसेवक; बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी मोठी तयारी!
03:22
Video thumbnail
जळकोटजवळ अपघाताचा दृश्य , कारच्या अवस्था पाहून चिंता व्हाल #accident #maharashtra
00:23
Video thumbnail
Nanded|हळदीला कमी भाव; संतप्त शेतकऱ्यांनी लिलावच बंद पाडला!
05:14
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये मनपाचा बुलडोझर मोड! एका दिवसात ₹94,600 दंड वसूल
01:44
Video thumbnail
Latur|२ ऑगस्टला दशनाम गोसावी समाजाचा पंचसूत्री कार्यक्रम
04:43
Video thumbnail
Nanded|दोन लाखांची कर्जमाफी कुठे गेली?' शेतकऱ्यांचा सरकारला थेट सवाल!
03:35
Video thumbnail
Nanded|'हवी ती चौकशी करा'; पेपरफुटीचे आरोप नेरलकरांनी धुडकावले
02:35
Video thumbnail
Nanded|MH-CET पेपरही फुटला? 99 पर्सेंटाइलवरून काँग्रेसचा मोठा आरोप!
02:16
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये चोरट्यांचा धडाका! एका रात्रीत सलग चार दुकाने फोडली
01:52
Video thumbnail
८ ऑगस्ट रोजी अकलूजमध्ये महिलांसाठी मोफत कॅन्सर निदान व तपासणी शिबिर
13:50

Latest news