नगरपरिषदेच्या सफाई कर्मचा-यांवर वेतनाअभावी उपासमारीची वेळ

पाथरी : शहराची अहोरात्र स्वच्छता राखणा-या सफाई कामगारांचे मागील ७ महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. या कर्मचा-यांवर वेतनाअभावी उपासमारीची वेळ आली आहे. या प्रकरणी तातडीने लक्ष देऊन कर्मचा-यांचे वेतन अदा करावे अशी मागणी होत आहे.

शहरातील नगरपरिषदेचे सफाई कामगार अत्यंत प्रामाणिकपणे पाथरी शहराच्या स्वच्छतेमध्ये आणि साफसफाईच्या कामात योगदान देत आहेत. मात्र, गेल्या ७ महिन्यांपासून त्यांना वेतन मिळालेले नाही. वेळेवर पगार होत नसल्यामुळे या कर्मचा-यांसमोर कुटुंबाच्या उदर्निवाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येकडे पाथरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी सफाई कर्मचा-यांकडून होत आहे.

शहरातील स्वच्छता कर्मचा-यांचे ७ महिन्यांचे वेतन थकीत असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वरीष्ठ अधिका-यांनी तात्काळ याकडे लक्ष देऊन न्याय द्यावा अशी मागणी संबंधीत कर्मचा-यांनी केली आहे. सफाई कर्मचा-यांची ही आर्त हाक नगरपरिषदेच्या कर्मचा-यांना ऐकू जाते का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
02:39:31
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41

Latest news