29.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूरनळगीर येथे एकाच दिवशी तिघांचा मृत्यू

नळगीर येथे एकाच दिवशी तिघांचा मृत्यू

उदगीर : प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील नळगीर येथे एकाच दिवशी वेगवेगळ्या कारणातून तिघांचा मृत्यू झाला असून एकाच दिवशी तिधांचा मृत्यू झाल्याने नळगीर गावावर शोककळा पसरली आहे. एकाच दिवशी मृत्यू पावलेल्यांच्या पार्थिवार नळगीरच्या स्मशान भुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. उदगीर तालुक्यातील नळगीर येथे दि. ७ मे रोजी येथील शेतकरी रमेश पांडूरंग नादरगे (बकारड्डी) वय ४९ वर्षे हे दुपारी २ वाजनेच्या सुमारास लोकसभा निडणुकीसाठी मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावून घराकडे जात असताना त्यांना चक्कर येऊन ते रस्त्यावर कोसळले यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा यात मृत्यू झाला. त्यांच्यावर अंत्यसंसकाराची तयारी सुरू असतानाच गावातील त्यांचे मावस काका मारोती हुलबा बाचावाड वय ८८ वर्षे यांचे वृधापकाळाने निधन झाले.

त्यांच्या निधनाची वार्ता समजते न समजते तोच गावातील व्यापारी नंदकुमार तुळशिराम मारमवार वय ६५ वर्षे यांचे नांदेड येथील एका खासगी रूग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाल्याची वार्ता नळगिरात धडकली. दि. ८ मे बुधवार रोजी शोकाकुल वातावरणात नळगीर येथील स्मशानभूमीत रमेश पांडूरंग नादरगे (बकारड्डी) यांच्या पार्थिवावर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तर त्यांचे मावस काका मारोती हुलबा बाचावाड यांच्या पार्थिवावर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले तर नंदकुमार तुळशिराम मारमवार यांच्या पार्थिवावर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR