29.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूरमतदानासाठी पैसे वाटप केल्याने चौघांवर गुन्हा

मतदानासाठी पैसे वाटप केल्याने चौघांवर गुन्हा

किल्लारी : वार्ताहर
धाराशिव लोकसभा मतदारसंघातील औसा तालुक्यातील रामेगाव येथे ६ मे रोजी रात्री ९.३० च्या दरम्यान घड्याळाला मतदान करा म्हणून बचत गटाच्या महिलाना काही राष्ट्रवादी पक्षाचे कार्यक्रर्ते पैसे वाटप करीत आसताना गावातील शिवसेनेचे कार्यकर्ते व नागरिकानी त्यांना धारेवर धरल्यावर ते आपली कार सोडून पळून गेल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी प्रशासनाकडून दिलेल्या फिर्यादीवरुन किल्लारी पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैसे वाटपाची माहिती मिळताच मडळ कृषी आधिकारी अशोक पिनाटे यांच्यासह पीएसआय गायववाड, पोहेकॉ दंतराव यानी घटनास्थळी पोहचून पैसे वाटपाचे सत्य जाणून घेतली. यावेळी सोडून गेलेली कार पोलीस ठाण्यास लावून चार अरोपीच्या विरोधात एनसी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी मंडळ आधिकारी अशोक पिनाटे यांच्या फिर्यादीनुसार हा गुन्हा अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रामेगाव (ता.औसा) यैथे प्रत्येक माहलेला चारशे रुपये वाटप करीत आसताना दुस-या पक्षाच्या कार्यकर्त्यानी पैसे वाटप करणास विरोध केल्यामुळे वाटप करणारे गाडी सोडून पळून गेले. त्या नंतर नागरिकानी पोलिसाना माहिती दिली. त्यानुसार ईरटिका एचपी ५३८-१६१४ या क्रमांकाची कारची तपासणी करण्यात आली असता आसता त्या कारमध्ये घड्याळाचे चिन्ह आसलेले पोस्टर सापडले.

या वरुन दि. ७ मे रोजी २०२४ रोजी सकाळी ७. ४४ वाजता किल्लारी पोलिस ठाण्यात रामेगाव येथील तनुजा विवेक शेळके, ईदुबाई बालाजी गुजोंटे, बालाजी गुजेंटे, प्रशांत डोके रा खरोसा यांनी पक्षाला मतदान करण्यासाठी लोकाना पैसे वाटप करुन लाच दिल्या प्रकरणी २४९/२०२४ कलम १७१, १२३ (१ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR