31 C
Latur
Wednesday, May 22, 2024
Homeमहाराष्ट्रनागपूरात नितीन गडकरींच्या प्रचाराचा धुरळा

नागपूरात नितीन गडकरींच्या प्रचाराचा धुरळा

नागपूर : लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजाले असून जवळ जवळ सर्वच पक्षानी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. अशातच नागपूर लोकसभा मतदारसंघातून महायुती आणि भाजपचे उमेदवार असलेले विद्यामन खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आजपासून आपला रीतसर प्रचार सुरू केला आहे. नितीन गडकरी यांनी आज नागपूरात लोकसंवाद यात्रेच्या माध्यमातून त्यांचा प्रचाराला सुरुवात केली आहे.

मध्य नागपुरातील भारतमाता चौक या ठिकाणी भारत मातेला वंदन करून गडकरी आज प्रत्यक्षपणे मैदानात उतरले आहेत. या लोकसंवाद यात्रेतून गडकरी मतदारांशी संवाद साधत आपण दहा वर्षांत केलेल्या कामांची माहिती देत आहे. तसंच पंतप्रधान मोदींना पुन्हा एकदा प्रचंड बहुमतानं निवडून आणण्याचं आवाहन देखील त्यांनी यावेळी मतदारांना केले आहे.

देशभर आपल्या विकासकामामुळे वेगळी छाप निर्माण करणारे केंद्रीय मंत्री आणि विद्यामन खासदार नितीन गडकरी सलग तिस-यांदा लोकसभा निवडणुकीच्या ंिरगणात उतरले आहे. नुकतेच त्यांनी आपल्या उमेदवारीचा अर्ज दाखल करताना जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. यावेळी आपण मोठ्या मताधिक्क्याने विजय संपादन करू असा विश्वास गडकारींनी बोलून दाखवला आहे. याच अनुषंगाने आज नितीन गडकरी यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून नागपूरकरांना साद घातली आहे. मध्य नागपुरात आज नितीन गडकरींनी लोकसंवाद यात्रा काढत मतदारांच्या दारपर्यंत जाण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आज मध्य नागपूरातील राजवाडा पॅलेस जवळील भारत माता चौक या ठिकाणी भारत मातेला वंदन करून गडकरींनी प्रचाराला सुरुवात केलीय.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR