40.1 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रमहायुतीच्या उमेदवारासाठी कागलचे कट्टर विरोधक एकत्र!

महायुतीच्या उमेदवारासाठी कागलचे कट्टर विरोधक एकत्र!

मुश्रीफ- घाटगे-मंडलिकांची बंद खोलीत चर्चा

कोल्हापूर : गेल्या महिन्याभरापासून उमेदवारी मिळणार की नाही या प्रतीक्षेमध्ये असलेल्या कोल्हापुरातील शिंदे गटाच्या दोन्ही खासदारांना पहिल्या यादीमध्ये उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचाराचा मार्ग मोकळा झाला आहे. कोल्हापूरमध्ये महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक हेच आहेत, तर हातकणंगलेमधून धैर्यशील माने उमेदवार असणार आहेत. संजय मंडलिक यांची लढत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्याशी होत असून धैर्यशील माने यांची लढत राजू शेट्टी यांच्याशी होईल. या सर्व पार्श्वभूमीवर आता प्रचाराला सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वेग आला आहे.

कोल्हापूरच्या राजकारणामध्ये कागलचे राजकारण हे नेहमीच वेगळे समजे जाते. त्याला राजकीय विद्यापीठ सुद्धा समजले जाते. याच कागलमध्ये सर्वाधिक गटातटाचे राजकारण होत असते. इथं पक्षनिष्ठेपाक्षा गटाला प्राधान्य सर्वाधिक दिलं जातं. या सर्व पार्श्वभूमीवर कागलमधील तीन कट्टर विरोधक गट एकत्र आल्याने राजकीय भूवया उंचावल्या गेल्या. भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितंिसह घाटगे, अजित पवार गटातील वैद्यकीय शिक्षण मंत्री अजित पवार आणि महायुतीचे उमेदवार शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक एकत्र आले. त्यांनी बंद खोलीमध्ये चर्चा केली.

मंडलिक यांना सर्वाधिक मताधिक्य देण्यासाठी पारंपारिक विरोधकांनी एकत्रित येत व्यूहरचना आखली आहे. महायुतीच्या प्रमुख पदाधिका-यांची बैठक पार पडल्यानंतर तिघांनी एकत्रित बंद खोलीमध्ये स्वतंत्र चर्चा केली. सुमारे अर्धा तास तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. दरम्यान सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडला आहे. त्याचे पडसाद कोल्हापूरमध्ये सुद्धा उमटलेत का? अशी परिस्थिती निर्माण झाली होता. आज अचानक शिवसेना ठाकरे गटाकडून शाहू महाराजांचा प्रचार बंद करण्यात आल्याची चर्चा होती. मात्र त्यानंतर संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी सर्व शक्यता फेटाळून लावत महाराजांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, अरुंद दुधवडकर यांनी हातकणंगले मतदारसंघाबाबत काल बैठक झाल्याचे सांगितले. राजू शेट्टी यांनी नकार दिला आहे, त्यामुळे मशाल चिन्हावर जो लडेल तो ंिजकणार असून याबाबतीत वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असे सांगितले. मतदारसंघांमध्ये तीन नावे चर्चेत असल्याचे ते म्हणाले. सुजित मिणचेकर यांच्यासह इतर इच्छुक असल्याचे म्हणाले. त्यां कोल्हापुरात शाहू महाराजांच्या प्रचार थांबवण्यासाठी सांगण्यात आले का? याबाबत विचारलं त्यांनी कोल्हापूर दौ-यामध्येच उद्धव साहेबांनी शाहू महाराजांना पांिठबा दिला. तेव्हाच आम्ही प्रचार सुरु केल्याचे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR