32.6 C
Latur
Tuesday, May 14, 2024
Homeपरभणीनिम्न दुधना प्रकल्पातून नदीपात्रात लवकरच पाणी सोडणार : आ.डॉ.राहूल पाटील

निम्न दुधना प्रकल्पातून नदीपात्रात लवकरच पाणी सोडणार : आ.डॉ.राहूल पाटील

परभणी : परभणी विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील नागरीकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभुमीवर नागरीकांचा तसेच जनावरांचा पिण्याचा प्रश्न सुटण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे अशी मागणी लाभक्षेत्र विकास व प्राधिकर मुख्य अभियंता व जिल्हाधिकारी यांच्याकडे आ. डॉ. राहूल पाटील यांनी केली होती.

या मागणीनुसार जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रस्ताव प्राप्त होताच निम्न दुधना प्रकल्पातून नदी पात्रात लवकरच पाणी सोडण्यात येईल अशी माहिती लोअर दुधना प्रकल्प लाभक्षेत्र विकास व प्राधिकरण मुख्य अभियंता सबीनवार यांनी दिली आहे. तसेच मा. जिल्हाधिकारी लवकरच निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी प्रस्ताव पाठवणार असल्याचेही असल्याचे आ.डॉ. राहूल पाटील यांनी सांगितले आहे. यामुळे परभणी तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न ब-याच प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.

परभणी तालुक्यामध्ये ग्रामीण भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे. दुधना नदी पात्र कोरडे पडल्यामुळे नागरिक व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. दुधना नदीच्या लाभ क्षेत्रातील मालेगाव, दुधनगाव, कुंभारी, झरी, मांडवा, जवळा खुर्द, जलालपूर, पिंपळा, नांदापूर, सोनपुरी, करडगाव, हिंगला, धारणगाव, साटला, समसापूर, मांगणगाव, धार, मटकराळा, देवठाणा, मुरुंबा, पिंपळगाव, साबा, आलापुर पांढरी, नांदगाव, राहटी या गावातील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला असून जनावरांनाही पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही.

पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी दुधना प्रकल्पातून नदीपत्रात पाणी सोडावे अशी मागणी परभणी शिवसेना ठाकरे गटाचे आ.डॉ. पाटील यांनी काही दिवसापूर्वी लाभक्षेत्र विकास व प्राधिकरण मुख्य अभियंता तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. या मागणीला लोअर दुधना पाटबंधारे विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला असुन जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रस्ताव येताच तातडीने पाणी सोडण्याची कार्यवाही करु असे अश्वासन मुख्य अभियत्यांनी दिले आहे. तसेच परभणी तालुक्यातील पाणी टंचाई निवारणासाठी प्रस्ताव पाठविण्याबाबत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याशी आ.डॉ.पाटील यांनी चर्चा केली असता लवकरच प्रस्ताव पाठवु असे अश्वासन जिल्हाधिकारी गावडे यांनी दिले आहे. त्यामुळे नदीपात्रात लवकरच पाणी सोडण्यात येणार असल्याने पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न मार्गी लागणार असल्याने शेतक-यांनी आ.डॉ. पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR