36 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeसोलापूरपोलिस आयुक्तालयातील पोलिसनिरीक्षकांच्या बदल्या

पोलिस आयुक्तालयातील पोलिसनिरीक्षकांच्या बदल्या

सोलापूर :
सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्याचे आदेश पोलिस र आयुक्त एम राजकुमार यांनी दिले आहेत. त्यानुसार एमआयडीसी पोलिस ठाण्याकडे पोलिस निरीक्षक – प्रमोद वाघमारे यांची तर विशेष शाखेकडे महिला पोलिस निरीक्षक वैष्णवी पाटील यांची बदली न करण्यात आली. यापूर्वी पोलिस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांची विजापूर नाका पोलिस ठाण्याकडे बदली करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील पोलिस दलातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या होत्या. यामध्ये सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयातील पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश होता. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी या बदलीविरोधात मॅट कोर्टात जाऊन बदलीला स्थगिती
मिळविली होती. दरम्यान, निवडणुक आयोग व मॅट कोटनि दिलेल्या सूचनेनुसार काही पोलिस निरीक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात आल्याचे आदेश गृहविभागाने काढले होते.

त्यामध्ये सोलापूरातील विजापूर नाका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शहाजी पवार व एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक विनायक वेताळ यांची सोलापूर शहर आयुक्तालयात झालेली बदली रद्द करण्यात आली होती. त्यानुसार या दोन्ही अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले. विजापूर नाका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शहाजी पवार यांना कार्यमुक्त केल्यानंतर त्यांच्याजागी पोलिस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तर पोलिस निरीक्षक वेताळ यांनादेखील कार्यमुक्त करण्यात आलेले आहे. महिला पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले यांची धाराशिव येथे बदली झाल्याने सोमवारी त्यांना कार्यमुक्त करून त्यांच्याजागी विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांची तर विशेष शाखेला नियत्रंण कक्षातील महिला पोलिस निरीक्षक वैष्णवी पाटील यांची नियुक्ती करण्याचे आदेश पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी दिले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR