निलंगा आगाराची बस दोन स्कूल बसवर धडकली

औसा : प्रतिनिधी
लातूर-औसा रोडवरील पेठ परिसरात सोमवारी दुपारी घडलेल्या एका धक्कादायक अपघातात निलंगा आगाराची एसटी बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन स्कूलबसवर जाऊन धडकली. या अपघातात बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालकाने प्रसंगावधान राखून बस मोकळ्या जागेत नेल्यामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
निलंगा आगाराची एमएच-२० बीएल-२५७० क्रमांकाची एसटी बस दुपारी सुमारे दीड वाजता लातूर बसस्थानकातून औसाकडे निघाली होती. पेठ परिसरातील किड्स शाळेजवळ बस पोहोचताच बसमधील एका प्रवाशाने अचानक चालकाच्या पाठीमागे जाऊन स्टेअरिंगला हात घालत ते वळविल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शी व बसमधील प्रवाशांनी केला आहे. त्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या कडेला विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या दोन स्कूलबसवर जाऊन धडकली. या अपघातात एमएच-२६ एन-९१४३ व एमएच-२५ टी-०५८६ क्रमांकाच्या दोन्ही स्कूलबसचे मोठे नुकसान झाले. एसटी बसच्या पुढील भागाचेही मोठे नुकसान झाले आहे. घटना घडताच बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. अचानक झालेल्या धडकेमुळे अनेक प्रवासी जखमी झाले. त्यांना तातडीने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींची नावे  समजू शकली  नव्हती.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, बसने दोन स्कूलबसना धडक दिल्यानंतरही चालकाने धैर्य न गमावता बस सुमारे शंभर फूट पुढे मोकळ्या जागेत नेऊन थांबविली. स्कूलबस विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत उभ्या होत्या. सुदैवाने विद्यार्थ्यांची मोठी गर्दी नसल्याने मोठी जीवितहानी टळली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|MH-CET पेपरही फुटला? 99 पर्सेंटाइलवरून काँग्रेसचा मोठा आरोप!
02:16
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये चोरट्यांचा धडाका! एका रात्रीत सलग चार दुकाने फोडली
01:52
Video thumbnail
८ ऑगस्ट रोजी अकलूजमध्ये महिलांसाठी मोफत कॅन्सर निदान व तपासणी शिबिर
13:50
Video thumbnail
Solapur|उजनी धरण 100 टक्के भरले; भीमा नदीत विसर्ग सुरू
00:23
Video thumbnail
Nanded|हिमायतनगर शहरात घाणीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप!
08:31
Video thumbnail
Latur|१ ऑगस्टपर्यंत आरक्षण उपवर्गीकरण जाहीर करा; मातंग समाजाचा इशारा
05:28
Video thumbnail
Latur|किड्स इन्फो पार्कजवळ एसटी आणि स्कूल बसचा अपघात; काही जण किरकोळ जखमी!
00:40
Video thumbnail
Latur|वाहतूक कोंडीला ब्रेक लावण्यासाठी लातुरात मोठा ड्राइव्ह; अतिक्रमणावर कारवाई सुरू!
02:58
Video thumbnail
Nanded|डिजिटल अरेस्टच्या नावाने सायबर ठगांचा नवा डाव; नांदेडमध्ये ५१ लाखांची फसवणूक
03:31
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या मुद्द्यावर नगरसेवकही रस्त्यावर; महामोर्चात सक्रिय सहभाग!
03:13
Video thumbnail
Latur|आरक्षण उपवर्गीकरणासाठी लातूरमध्ये हजारोंचा एल्गार; महामोर्चाला मोठा प्रतिसाद!
03:32
Video thumbnail
CJP Protest|विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट? शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा
12:07
Video thumbnail
Latur|लातुरात गोर बंजारा कवींचा जल्लोष; मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते कवी संमेलनाचे उद्घाटन!
00:43
Video thumbnail
Latur|मराठवाड्याच्या वीर सुपुत्राला मानवंदना; पानगावात कारगिल शहीद बालाजी माले यांचे स्मरण!
01:11
Video thumbnail
Latur|विठुरायाच्या भक्तांसाठी मनसेची सेवा; अन्नछत्रासह मोफत आरोग्य तपासणी!
02:53

Latest news