नेत्यांना हनी ट्रॅपमध्ये फसविण्याचा डाव!

जैशच्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अटकेत
कोलकाता : वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमधील राजकीय नेते आणि व्हीआयपी व्यक्तींना हनी ट्रॅपमध्ये फसवून त्यांची संवेदनशील गुप्त माहिती गोळा करण्याचा एक अत्यंत मोठा कट स्पेशल टास्क फोर्सने उधळून लावला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित संशयित ऑपरेटर मोहम्मद हामिम मंडलच्या अटकेनंतर त्याच्या प्रेयसीला म्हणजेच अर्पिता सरकारला झारखंडच्या साहिबगंज येथून अटक करण्यात आली.
अर्पिता सरकारला साहिबगंज येथून ताब्यात घेऊन बंगालमधील बर्धमान येथे आणण्यात आले. या दोघांमध्ये व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून झालेला डिजिटल संवाद आणि चॅट एसटीएफने जप्त केले असून, त्यांच्या आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा तपास सुरू आहे. दरम्यान, अर्पिता सरकारला १३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

विशेष पथकाने ३० जुलै रोजी बर्धमान शहरातील एका गृहनिर्माण संस्थेतील भाड्याच्या अपार्टमेंटमधून मोहम्मद हामिम मंडलला बेड्या ठोकल्या होत्या. मंडल हा आयएसआय समर्थित दहशतवादी नेटवर्कचा भाग असल्याचा संशय आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्यांसह इतर प्रमुख राजकीय व्यक्तींची वैयक्तिक माहिती गोळा करणे, नवीन ऑपरेटिव्हची भरती करणे आणि संभाव्य दहशतवादी कारवायांसाठी पाया तयार करणे, हे काम त्याच्यावर सोपवण्यात आले होते.

जाळ््यात ओढण्यासाठी
केला महिलेचा वापर
आरोपीने अनेक राजकीय नेत्यांची संवेदनशील व खासगी माहिती मिळवण्यासाठी एक विस्तृत जाळे तयार केले होते. या नेटवर्कमध्ये अर्पिता सरकारचा वापर नेत्यांशी संपर्क साधण्यासाठी आणि त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी केला जात होता. जप्त केलेल्या डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलिस या हनी ट्रॅप नेटवर्कचा कसून तपास करत आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06
Video thumbnail
Latur|वडवळमध्ये घाणीचं साम्राज्य; ग्रामस्थांचा संताप
01:39
Video thumbnail
Purna|५० वर्षांचा गौरवशाली प्रवास! पूर्ण्यात जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव
01:48
Video thumbnail
Latur|हैदराबादपेक्षाही भव्य? लातुरात उभारला जाणार 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज'
02:14
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा परिणाम; लातूरची सिटी बस सेवा पुन्हा सुरू
03:24
Video thumbnail
Latur|साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
02:14
Video thumbnail
Nanded|२०२६ मध्येही अशी अवस्था! गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ
02:13
Video thumbnail
Nanded|हद्दपार आरोपीची किनवटच्या रस्त्यांवर पोलिसांनी काढली धिंड!
00:28
Video thumbnail
Latur|धावत्या ई-बाईकला अचानक आग; दोन स्फोटांनी उडाली खळबळ!
00:31
Video thumbnail
Nanded|MPSC मध्ये प्रथम आलेला अधिकारी लाचप्रकरणात अटकेत; संपत्तीची चौकशी सुरू
02:19
Video thumbnail
Latur|लातूरची सिटी बस सेवा ५ दिवसांपासून बंद; प्रवाश्यांचे हाल
03:29
Video thumbnail
Latur|लातुरात अण्णाभाऊ साठे जयंती सामाजिक उपक्रमांनी गाजली
01:38
Video thumbnail
Latur|'आरक्षणावरून समाजात तेढ नको' – माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे आवाहन
05:23
Video thumbnail
Nanded|संतप्त नागरिकांनी थेट नगरपंचायत कार्यालयातच टाकला कचरा!
01:59

Latest news