मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारी आणि इतर पात्र सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात २ टक्के वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे कर्मचा-यांचा महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्के इतका झाला आहे. महागाई भत्त्यातील ही वाढ पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे जानेवारी २०२६ पासून लागू होईल. वित्त विभागाने मंगळवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला.
वाढीव महागाई भत्ता ऑगस्ट २०२६ पासून लागू आहे. तर जानेवारी २०२६ ते जुलै २०२६ या सात महिन्याच्या कालावधीतील थकबाकीची रक्कम सुद्धा ऑगस्ट महिन्याच्या वेतनसोबत रोखीने दिली जाणार आहे. राज्यातील सुमारे ५ लाखाहून अधिक शासकीय कर्मचारी तसेच सुमारे ८ लाखापेक्षा अधिक सेवानिवृत्त कर्मचा-यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
















