पडिक जमिनीचा वापर करून मराठवाड्यात वनक्षेत्र वाढवा

माजी मंत्री आमदार अमित देशमुख, मराठवाड्यात ३ टक्क्यांपेक्षा कमी वनक्षेत्र, टास्क फोर्सची केली घोषणा

मुंबई/लातूर : प्रतिनिधी
पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर एकूण भूभागाच्या तुलनेत किमान ३३ टक्के वनक्षेत्र असणे आवश्यक आहे. मराठवाड्यात मात्र ३ टक्क्यांपेक्षा कमी वनक्षेत्र आहे. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती आणि कमी पर्जन्यमान पाहता या भागात वनीकरणाची नितांत गरज आहे. पडिक जमिनींचा वापर करून वनीकरण वाढविण्यासाठी शासन प्रयत्न करणार का आणि त्यासाठी टास्क फोर्स स्थापन करणार का, असा प्रश्न राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज विधानसभेत उपस्थित केला.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातील प्रश्नोत्तराच्या तासात महाराष्ट्र विधानसभा सभागृहात ९ जुलै रोजी बोलताना माजी मंत्री आमदार देशमुख म्हणाले की, मराठवाड्यातील अनेक शेतक-यांच्या जमिनी पडीक आहेत, तसेच वन विभागाच्याही अनेक जमिनी ओसाड पडून आहेत. या जमिनी भाडेतत्त्वावर घेऊन किंवा इतर पर्यायांचा विचार करून त्याठिकाणी वनीकरण वाढविण्यासाठी वन विभाग प्रयत्न करणार आहे का? तसेच या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सरकार एखादा टास्क फोर्स तयार करणार आहे का?

यावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की, मराठवाड्यासह राज्यातील शासकीय पडिक जमिनींचा उपयोग करून घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मराठवाड्यात वनीकरण वाढविण्यासाठी आणि वृक्ष लागवडीची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी निश्चितपणे ‘टास्क फोर्स’ तयार केला जाईल. यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींचाही सदस्य म्हणून समावेश केला जाईल. वनमंत्र्यांनी यावेळी महत्त्वपूर्ण उपाययोजना स्पष्ट केली.

बांबू लागवडीवर भर देणार
बांबू लागवडीवर भर दिला जाणार असून बांबूपासून इथेनॉल निर्मिती करता येते. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ आणि कोकण यांसारख्या भागांतील पडिक जमिनींवर बांबूची लागवड करून वनीकरण वाढवले जाईल, असे सांगितले. वनमंत्री म्हणाले की, या योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील पडिक वनजमिनी निवडल्या जातील. या जमिनींना संरक्षक भिंत (कंपाऊंड) उभारून तेथे वृक्ष लागवड केली जाईल, या उपक्रमामुळे पशू-पक्ष्यांचा अधिवास वाढण्याच्या दृष्टीने व्यापक प्रयत्न केले जातील. तसेच तेथे नंतर बांबू लागवड केली जाईल. यामुळे पूरक उत्पन्न मिळेल, असे सांगण्यात आले.

पर्यावरणाचे संतुलन
राखण्यास मदत होणार
पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होईल. वन विभाग आणि सरकार या दिशेने तातडीने कार्यवाही करेल, असे यावेळी सांगण्यात आले. माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नामुळे मराठवाड्यातील ओसाड जमिनींना नवी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
NANDED|नांदेडमध्ये पाकिस्तान कनेक्शन? FDA-पोलिसांची मोठी कारवाई
01:53
Video thumbnail
Nanded|पत्नी नांदायला येत नसल्याने युवक थेट हाय व्होल्टेज टॉवरवर चढला
01:24
Video thumbnail
Latur|जिल्हा परिषदेत नेमकं चाललंय तरी काय?" आशाताई भिसेंचा सवाल
05:02
Video thumbnail
LIVE- लातूर जिल्हा परिषदेच्या काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या आशाताई भिसे यांची पत्रकार परिषद
00:00
Video thumbnail
LIVE- लातूर जिल्हा परिषदेच्या काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या आशाताई भिसे यांची पत्रकार परिषद
35:17
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
37:07
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये नव्या पुलाचा भाग अचानक कोसळला; मोठी दुर्घटना टळली!
03:36
Video thumbnail
Latur|लातुरात भूकंपाचे धक्के; प्रशासन अलर्ट मोडवर!
02:55
Video thumbnail
Latur| अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण; MIDC पोलिसांच्या केले स्वाधीन!
01:30
Video thumbnail
Latur Earthquake Tremors|मराठवाडा पुन्हा हादरला! मध्यरात्री सलग ४ भूकंपाचे धक्के
01:36
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
46:16
Video thumbnail
Latur|लातूर मनपाच्या स्थायी समिती बैठकीत फाईल गहाळ प्रकरणावर मोठा गदारोळ!
02:27
Video thumbnail
Latur|वासनगाव–गंगापूर रस्त्याची अखेर तातडीने दुरुस्ती सुरू!
01:50
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
09:33
Video thumbnail
Solapur|अक्कलकोटमध्ये पावसाची दडी; खरीप पेरण्या पूर्णपणे रखडल्या!
01:56

Latest news