मान्सूनने देश व्यापला

मुंबई, पुणे, कोकणातील पावसाचा जोर ओसरणार
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात मुंबईसह ठाणे पालघर आणि कोकणात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे या भागांतील जनजीवन विस्कळीत झाले. आता मान्सून संपूर्ण देशात व्यापला आहे. त्यामुळे हा पाऊस उत्तरेकडे सरकत आहे. त्यामुळे उद्यापासून म्हणजे १० जुलैपासून मुंबईसह कोकण वगळगता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिली.

सरासरी ८ जुलै रोजी देश काबीज करणारा मान्सून १ दिवस उशिराने आज ९ जुलै रोजी देशात पोहोचला. मान्सून काळात समुद्र सपाटी ते दीड कि. मी. उंचीपर्यंतचा हवेच्या कमी दाबाचा देशाच्या मध्यावर असणारा मान्सूनचा स्टफ काहीसा उत्तरेकडे म्हणजे अनुपगड, रोहतक, फुरसतगंज, देहरी, धनबाद, बांकुरा, दिघा ते बंगालच्या उपसागरापर्यंत स्थित आहे.
त्यातच महाराष्ट्रात काही भागांत सुरू असलेल्या पावसाचा जोर शुक्रवार, दि. १० जुलै रोजी मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात पाऊस ओसरण्याची शक्यता आहे. आज काही भागात उघडीप जाणवली. मुंबईसह कोकणातही पावसाचा जोर ओसरला. उर्वरित महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. शुक्रवार दि. १० जुलै ते रविवार दि. १९ जुलैपर्यंतच्या संपूर्ण दहा दिवसात मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात उघडीप मिळण्याची शक्यता आहे.

राज्यात मान्सूनला ब्रेक
मान्सून देशात व्यापला असला तरी मुंबईसह कोकण, पुणे, पश्चिम महाराष्ट्राला झोडपून काढणारा पावसाचा वेग मंदावणार आहे. कोरड्या वा-यामुळे हवेतील आर्द्रता कमी होईल. त्यामुळे राज्यातील ब-याच भागांत मान्सूनला ब्रेक लागणार आहे. २० जुलैपर्यंत राज्यात मान्सून सक्रीय होण्याची शक्यता खूपच कमी आहे, असे कृषी खात्याने म्हटले.

मुंबई ६ दिवसात
१२४० मिमी पाऊस
मुंबईने यंदा पावसाचा एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. जून कोरडा गेला. त्यानंतर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईने सर्व विक्रम मोडले. ३० जून ते ६ जुलैदरम्यान दिल्लीत संपूर्ण हंगामात पडणा-या पावसाएवढा आणि बंगळुरूच्या वार्षिक पावसाएवढा मुंबईत पाऊस झाला. ६ दिवसांत अंदाजे १२४० मि.मी. पाऊस झाला असून, हा गेल्या शतकातील सर्वाधिक पाऊस ठरला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
NANDED|नांदेडमध्ये पाकिस्तान कनेक्शन? FDA-पोलिसांची मोठी कारवाई
01:53
Video thumbnail
Nanded|पत्नी नांदायला येत नसल्याने युवक थेट हाय व्होल्टेज टॉवरवर चढला
01:24
Video thumbnail
Latur|जिल्हा परिषदेत नेमकं चाललंय तरी काय?" आशाताई भिसेंचा सवाल
05:02
Video thumbnail
LIVE- लातूर जिल्हा परिषदेच्या काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या आशाताई भिसे यांची पत्रकार परिषद
00:00
Video thumbnail
LIVE- लातूर जिल्हा परिषदेच्या काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या आशाताई भिसे यांची पत्रकार परिषद
35:17
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
37:07
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये नव्या पुलाचा भाग अचानक कोसळला; मोठी दुर्घटना टळली!
03:36
Video thumbnail
Latur|लातुरात भूकंपाचे धक्के; प्रशासन अलर्ट मोडवर!
02:55
Video thumbnail
Latur| अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण; MIDC पोलिसांच्या केले स्वाधीन!
01:30
Video thumbnail
Latur Earthquake Tremors|मराठवाडा पुन्हा हादरला! मध्यरात्री सलग ४ भूकंपाचे धक्के
01:36
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
46:16
Video thumbnail
Latur|लातूर मनपाच्या स्थायी समिती बैठकीत फाईल गहाळ प्रकरणावर मोठा गदारोळ!
02:27
Video thumbnail
Latur|वासनगाव–गंगापूर रस्त्याची अखेर तातडीने दुरुस्ती सुरू!
01:50
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
09:33
Video thumbnail
Solapur|अक्कलकोटमध्ये पावसाची दडी; खरीप पेरण्या पूर्णपणे रखडल्या!
01:56

Latest news