१७ जुलैपर्यंत अनेक रेल्वेगाड्या रद्द

मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वे विभागाचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी
राजधानी मुंबई, कोकण आणि पुण्यातही गेल्या ४ ते ५ दिवसांत मुसळधार पाऊस पडला असून लोणावळ््यातही धो-धो पाऊस कोसळला. त्यामुळे लोणावळा भागात काही ठिकाणी रेल्वे मार्गावर दरडी कोसळल्या. त्यामुळे २ दिवसांपूर्वी रेल्वेसेवा विस्कळीत झाली. आता वाहतूक सुरळीत करण्याचे काम रेल्वे विभागाकडून सुरू आहे. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने १० ते १७ जुलैदरम्यान अनेक नियमित तसेच विशेष एक्स्प्रेस गाड्या तात्पुरत्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

लोणावळा-कर्जत रेल्वे मार्गावर ६ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. तीनही रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वेकडून युद्धपातळीवर काम सुरू असले तरी मोठ्या प्रमाणावरील नुकसान आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे दुरुस्तीला वेळ लागणार आहे. त्यामुळे १० ते १७ जुलैदरम्यान ब-याच गाड्या रद्द केल्या आहेत.

या गाड्या रद्द
रद्द करण्यात आलेल्या प्रमुख गाड्यांमध्ये डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी इंटरसिटी, सीएसएमटी-हैदराबाद एक्स्प्रेस, हुबळी-दादर एक्स्प्रेस, दौंड-इंदूर एक्स्प्रेस आणि चेन्नई एग्मोर सुपरफास्ट मेल यांचा समावेश आहे. तसेच महालक्ष्मी एक्स्प्रेस, दादर-सातारा, दादर-साईनगर शिर्डी या गाड्याही विविध तारखांना रद्द करण्यात आल्या.

लांब पल्ल्याच्या
विशेष गाड्याही रद्द
सीएसएमटी-गोरखपूर, पुणे-गोरखपूर, पुणे-गाझीपूर सिटी आणि पुणे-हजरत निजामुद्दीन या विशेष गाड्याही संबंधित तारखांना रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून दुरुस्तीच्या कामावर लक्ष ठेवून आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
NANDED|नांदेडमध्ये पाकिस्तान कनेक्शन? FDA-पोलिसांची मोठी कारवाई
01:53
Video thumbnail
Nanded|पत्नी नांदायला येत नसल्याने युवक थेट हाय व्होल्टेज टॉवरवर चढला
01:24
Video thumbnail
Latur|जिल्हा परिषदेत नेमकं चाललंय तरी काय?" आशाताई भिसेंचा सवाल
05:02
Video thumbnail
LIVE- लातूर जिल्हा परिषदेच्या काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या आशाताई भिसे यांची पत्रकार परिषद
00:00
Video thumbnail
LIVE- लातूर जिल्हा परिषदेच्या काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या आशाताई भिसे यांची पत्रकार परिषद
35:17
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
37:07
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये नव्या पुलाचा भाग अचानक कोसळला; मोठी दुर्घटना टळली!
03:36
Video thumbnail
Latur|लातुरात भूकंपाचे धक्के; प्रशासन अलर्ट मोडवर!
02:55
Video thumbnail
Latur| अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण; MIDC पोलिसांच्या केले स्वाधीन!
01:30
Video thumbnail
Latur Earthquake Tremors|मराठवाडा पुन्हा हादरला! मध्यरात्री सलग ४ भूकंपाचे धक्के
01:36
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
46:16
Video thumbnail
Latur|लातूर मनपाच्या स्थायी समिती बैठकीत फाईल गहाळ प्रकरणावर मोठा गदारोळ!
02:27
Video thumbnail
Latur|वासनगाव–गंगापूर रस्त्याची अखेर तातडीने दुरुस्ती सुरू!
01:50
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
09:33
Video thumbnail
Solapur|अक्कलकोटमध्ये पावसाची दडी; खरीप पेरण्या पूर्णपणे रखडल्या!
01:56

Latest news