पावसाळ्यात उन्हाळा सुरू; गर्मीमुळे मुंबईकर हैराण

मुंबई : प्रतिनिधी
गेल्या दोन आठवड्यांपासून महाराष्ट्रात धुमाकूळ घालणा-या पावसाने आता काहीशी उसंत घेतली आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले, तर शेती, रस्ते आणि घरांचे मोठे नुकसान झाले. विशेषत: पालघर, नाशिक, पुणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला. मात्र आता पावसाचा जोर कमी झाल्याने अनेक भागांत उष्ण व दमट वातावरण जाणवू लागले असून मुंबईकरांना पुन्हा उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसानंतर आता पावसाचा जोर लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. बहुतांश भागांत पावसाने विश्रांती घेतली असून पुढील काही दिवस उघडीप कायम राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात. आज राज्यातील काही भागांसाठी यलो अलर्ट कायम असून पुणे, सातारा आणि घाटमाथा परिसरात अधूनमधून पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दोन ते तीन दिवसांनंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढू शकतो.
गेल्या आठवड्यात कोकणात मुसळधार पावसाने मोठा कहर केला होता. मात्र आता परिस्थिती तुलनेने शांत झाली आहे. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत हलक्या सरींचा अंदाज आहे, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. घाटमाथा परिसरात आधीच मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसानंतर आता पावसाचा जोर कमी झाला आहे. गुरुवारपासून शहर आणि उपनगरांत पावसाने विश्रांती घेतली असून पुढील काही दिवस हलक्या सरींचा अंदाज आहे. मात्र उष्ण आणि दमट हवामानामुळे उकाड्यात वाढ झाली असून नागरिकांना घामाच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.

उत्तर महाराष्ट्रात ऊन-पावसाचा खेळ
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता कायम आहे. नाशिकच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. इतर भागांत मात्र ढगाळ वातावरणासोबत अधूनमधून उन्हाचा तडाखाही जाणवू शकतो.

पश्चिम महाराष्ट्रात तुरळक सरी
पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता असून घाटमाथ्यावर मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत मात्र कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज आहे.

मराठवाड्यात उकाडा वाढण्याची शक्यता
छत्रपती संभाजीनगर, जालना आणि हिंगोली येथे हलक्या पावसाचा अंदाज असला तरी परभणी, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्ये पुढील काही दिवस कोरडे वातावरण राहू शकते. पावसाने विश्रांती घेतल्याने तापमानात वाढ होऊन उकाडाही वाढण्याची शक्यता आहे.

विदर्भात पावसाची प्रतीक्षा
अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत पुढील काही दिवस पावसाची शक्यता अत्यल्प आहे. समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक शेतकरी दुबार पेरणीच्या प्रतीक्षेत असून मान्सून पुन्हा सक्रिय होण्याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|खंडापूर देणगी अपहार प्रकरणात किशोर शिवणीकर अटकेत; दीड कोटींच्या बंगल्यातून एलसीबीची कारवा
05:16
Video thumbnail
Latur|आरक्षणावर नवा फॉर्म्युला! 'अ, ब, क, ड' ऐवजी दोनच गटांची मागणी
03:06
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये सहकार संकुलाचे भूमिपूजन; ११ कार्यालये येणार एकाच छताखाली
03:00
Video thumbnail
Latur|केबल चोरीच्या संशयावरून तीन मुलांना खांबाला बांधून बेदम मारहाण! #breakingnews
01:21
Video thumbnail
Parbhani|महापौरांवरील हल्ल्याच्या प्रयत्नानंतर संताप; कठोर कारवाईची मागणी
01:52
Video thumbnail
SOLAPUR|ओंकार शुगरजवळ भीषण अपघात; महिलेचा जागीच मृत्यू, वडील-मुलगी गंभीर जखमी
01:26
Video thumbnail
Solapur|कुर्डूवाडी बार्शी रोडवर ओंकार शुगर जवळ भीषण अपघात एक जागीच ठार #Marathinews #accidentnews
00:36
Video thumbnail
Big Breaking News|खंडापूर प्रकरणात मोठा ट्विस्ट; अखेर पिस्तुल्या महाराज अटकेत
01:07
Video thumbnail
Latur|शिवीगाळ पडली महागात! ड्रायव्हर-कंडक्टरने तरुणाला दिला चोप #breakingnews
00:53
Video thumbnail
प्रा. विठ्ठल कांगणे यांचे तुफान भाषण; विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष
27:52
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पुन्हा अतिक्रमण!कारवाईनंतर आठवड्यातच जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर पुन्हा गजबजला
02:58
Video thumbnail
Latur|विठ्ठल कांगणे मंचावर येताच विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष
09:34
Video thumbnail
Latur|MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार; ऑफलाइन परीक्षेसाठी लातूरात महामोर्चा
01:53
Video thumbnail
Parbhani Breaking News|परभणीत खळबळ! महापौरांवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न
03:05
Video thumbnail
Nanded|हिमायतनगर हादरलं! नामांकित कोचिंग क्लासेस संचालकाची आत्महत्या
01:36

Latest news