तुरुंगवास भोगून आलेल्या आरोपीकडून एकाच रात्री ६ खून

रंगा रेड्डी : वृत्तसंस्था
लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तुरुंगवास भोगून आलेल्या एका तरुणाने एक रक्तरंजित कांड केले आहे. आरोपीने एकाच रात्रीत तब्बल सहा जणांची हत्या केली आहे. त्याने पीडित मुलीला देखील गळा चिरून संपवले आहे. या रक्तरंजित थराराने संपूर्ण देश हादरला आहे. सहा जणांची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केल्याने सूड भावनेतून त्याने हे हत्याकांड घडवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

ही घटना तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यात घडली असून राजकुमार असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात १७ वर्षीय मुलीने लैंगिक अत्याचाराची तक्रार नोंदवली होती. मुलगी अल्पवयीन असल्याने पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. अटकेनंतर आरोपीला न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला. मात्र जामीन मिळल्यानंतरही आरोपीची पीडिता आणि तिच्या कुटुंबाप्रतीची सूडाची भावना संपली नव्हती. या सूडाच्या भावनेनेच आरोपीने कुटुंबाला लक्ष्य केल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे.

आरोपी राजकुमार शुक्रवारी रात्री थेट मुलीच्या घरी पोहोचला. त्याने धारदार शस्त्राने पीडित मुलगी, तिची आई आणि आजीवर हल्ला करून त्यांची हत्या केली. मुलीला घराबाहेर नेऊन तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार केल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. पण या दाव्याची अजून पुष्टी करण्यात आलेली नाही. शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या तपासानंतर अधिकृत माहिती स्पष्ट होईल.

पीडित कुटुंबाची हत्या केल्यानंतर आरोपी स्वत:च्या घरी परतला. घरी येऊन त्याने पत्नी सरिता आणि आपल्या दोन चिमुकल्या मुलांची हत्या केली. हत्याकांडानंतर स्वत:च्या वडिलांना फोन करून सगळी माहिती दिली आणि स्वत: देखील आत्महत्या करणार असल्याचे कळवले. वडिलांनी तातडीने पोलिसांना कळवले. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत आरोपी फरार झाला होता. आरोपीला पकडण्यासाठी नाकाबंदी आणि विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|खंडापूर देणगी अपहार प्रकरणात किशोर शिवणीकर अटकेत; दीड कोटींच्या बंगल्यातून एलसीबीची कारवा
05:16
Video thumbnail
Latur|आरक्षणावर नवा फॉर्म्युला! 'अ, ब, क, ड' ऐवजी दोनच गटांची मागणी
03:06
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये सहकार संकुलाचे भूमिपूजन; ११ कार्यालये येणार एकाच छताखाली
03:00
Video thumbnail
Latur|केबल चोरीच्या संशयावरून तीन मुलांना खांबाला बांधून बेदम मारहाण! #breakingnews
01:21
Video thumbnail
Parbhani|महापौरांवरील हल्ल्याच्या प्रयत्नानंतर संताप; कठोर कारवाईची मागणी
01:52
Video thumbnail
SOLAPUR|ओंकार शुगरजवळ भीषण अपघात; महिलेचा जागीच मृत्यू, वडील-मुलगी गंभीर जखमी
01:26
Video thumbnail
Solapur|कुर्डूवाडी बार्शी रोडवर ओंकार शुगर जवळ भीषण अपघात एक जागीच ठार #Marathinews #accidentnews
00:36
Video thumbnail
Big Breaking News|खंडापूर प्रकरणात मोठा ट्विस्ट; अखेर पिस्तुल्या महाराज अटकेत
01:07
Video thumbnail
Latur|शिवीगाळ पडली महागात! ड्रायव्हर-कंडक्टरने तरुणाला दिला चोप #breakingnews
00:53
Video thumbnail
प्रा. विठ्ठल कांगणे यांचे तुफान भाषण; विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष
27:52
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पुन्हा अतिक्रमण!कारवाईनंतर आठवड्यातच जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर पुन्हा गजबजला
02:58
Video thumbnail
Latur|विठ्ठल कांगणे मंचावर येताच विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष
09:34
Video thumbnail
Latur|MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार; ऑफलाइन परीक्षेसाठी लातूरात महामोर्चा
01:53
Video thumbnail
Parbhani Breaking News|परभणीत खळबळ! महापौरांवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न
03:05
Video thumbnail
Nanded|हिमायतनगर हादरलं! नामांकित कोचिंग क्लासेस संचालकाची आत्महत्या
01:36

Latest news