Homeसोलापूरपुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; ५ जणांचा जागेवरच मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; ५ जणांचा जागेवरच मृत्यू

सोलापूर : प्रतिनिधी
पनवेलवरून अक्कलकोटला देवदर्शनाला जाताना काळाने घाला घातला. पुणे-सोलापूर महामार्गावर मोहोळमध्ये एका कारचा शनिवारी रात्री भयंकर अपघात झाला. या अपघातात ५ जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेवर मोहोळमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये ३ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. सर्वजण पनवेलहून एर्टिका कारने अक्कलकोटला देवदर्शनला जात होते, त्यावेळी मोहोळमधील देवडी पाटी येथे भंयकर अपघात झाला.

पुणे-सोलापूर महामार्गावर मोहोळमध्ये एर्टिका कार आल्यानंतर चालकाचा अचानक ताबा सुटला. त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असणा-या झाडावर जोरदार आदळली. या भयंकर अपघातात ३ पुरुष आणि २ महिलांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. मोहोळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

अपघातग्रस्त वाहनातील सर्व भाविक हे एकमेकांचे मित्र होते. पनवेलमधील सेक्टर ७ मध्ये राहणा-या ज्योती जयदास टाकले या अपघातामधून थोडक्यात बचावल्या आहेत. त्या गंभीर जखमी असून मोहोळमधील ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. देवदर्शनाला जाताना भयंकर अपघात झाल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अपघात इतका भयंकर होता की कारचा चुराडा झाला. मृतदेह कारमध्ये चेंदामेंदा झालेल्या अवस्थेत बाहेर काढण्यात आले. कार हायवेपासून १० ते १५ फूट अंतरावर झुडुपांमध्ये अडकली होती. अपघातामधील मृतांची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत आहे. मोहोळ पोलिसी स्टेशनमधील पोलिस निरीक्षक शेडगे या अपघाताचा तपास करत आहेत. या घटनेची नोंद करण्यात आलेली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR