प्रगतीला गती देणारा कौल! महाराष्ट्रातील ‘महाविजया’वर मोदींचे शिक्कामोर्तब

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महापालिकांच्या निकालांचे कल स्पष्ट झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, “राज्यातील उत्साही जनतेने एनडीएच्या जनहितकारी आणि सुशासनाच्या अजेंड्याला आपले आशीर्वाद दिले आहेत. आमच्या कामगिरीचा अनुभव आणि विकासाची दृष्टी जनतेच्या मनाला भावली आहे, हेच या निकालातून दिसून येते. हा कौल केवळ राजकीय विजय नसून राज्याच्या प्रगतीला अधिक गती देणारा आणि आपल्या गौरवशाली संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा आहे.

या यशात भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा मोठा वाटा असल्याचे सांगत पंतप्रधानांनी त्यांचे विशेष कौतुक केले. “महाराष्ट्रभर जनतेसोबत राहून अहोरात्र परिश्रम करणाऱ्या एनडीएच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मला अभिमान आहे. त्यांनी आमच्या युतीच्या कामगिरीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली आणि त्याच वेळी विरोधकांच्या खोट्या आरोपांना प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले,” असे म्हणत मोदींनी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले आहे.

‘मोदी मॅजिक’ कायम?

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या २९ पैकी २५ महापालिकांमध्ये महायुतीने आघाडी घेतली आहे. मुंबईसह पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विजयाला ‘महाविजय’ म्हटले असतानाच, आता पंतप्रधान मोदींनीही या विजयावर आनंदाची मोहोर उमटवली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE : एकमत कार्यालयातील गणपती बाप्पांची आरती | श्री गणेश आरती | Ekmat Digital
07:25
Video thumbnail
Nanded|ST आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक! नांदेड-नागपूर महामार्गावर 2 तास रास्ता रोको
02:31
Video thumbnail
Latur|मसलग्यात बैलगाडी मोर्चा! शेतकऱ्यांचा महामार्गावर रस्ता रोको, सरकारला इशारा
02:17
Video thumbnail
Latur|देवणी पोलिसांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली! शेतातून महाकाय मगर जेरबंद
00:36
Video thumbnail
Latur|एकमत कार्यालयात गणरायाची आरती; माऊली शिक्षण संस्थेचे गंगाधर आराडले यांची उपस्थिती
02:52
Video thumbnail
Latur|संजीव सोनवणे प्रकरणात मोठी अपडेट! सुसाईड नोटची होणार तपासणी | DYSP समीरसिंह साळवे
02:37
Video thumbnail
AUSA ANDOLAN |लातूरसह मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा! औशात हजारो महिला रस्त्यावर
03:58
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये खळबळ! संजीव सोनवणे यांच्या मृत्यूप्रकरणी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी
03:31
Video thumbnail
Latur|औशातून दुष्काळाचा एल्गार! तहसील कार्यालयासमोर संभाजी सेनेचे ठिय्या आंदोलन
05:55
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये खळबळ! प्रसिद्ध संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी गोळी झाडून केली आत्महत्या...
01:01
Video thumbnail
Raj Thackeray LIVE| राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी गणरायाचा आगमन
23:24
Video thumbnail
Latur|लातूरमधून मुंबईकडे ८००-९०० वाहनं! मराठा आंदोलनाची जोरदार तयारी
04:58
Video thumbnail
Nanded Ganeshotsav 2026 |नांदेडमध्ये गणरायाचे उत्साहात आगमन! घरोघरी आणि मंडळांमध्ये बाप्पा विराजमान
02:42
Video thumbnail
Ganeshotsav 2026|लातूरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; बाप्पांच्या खरेदीसाठी गर्दीच गर्दी
03:25
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:54

Latest news