हिमालय, प्रसिद्ध ओम् पर्वतावरील बर्फ गायब

डेहराडून : वृत्तसंस्था
उत्तराखंडमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीच्या कमतरतेमुळे हिमालय काळा पडत चालला आहे. पिथौरागढ जिल्ह्यात असलेले पंचाचूली, हंसलिंग आणि जगप्रसिद्ध ॐ पर्वत हिवाळ्यात बर्फाच्या जाड थराने झाकलेले असायचे, पण आता ते नाममात्र बर्फासह उभे आहेत. ही परिस्थिती केवळ चिंताजनक नाही, तर हिमालयाच्या बदलत्या हवामानाचेही सूचक आहे.

जानेवारीचा अर्धा महिना उलटला आहे, पण अजूनही बर्फवृष्टी झालेली नाही. दिवसा उन्हाच्या तीव्रतेमुळे उरलेला बर्फही वितळत आहे, ज्यामुळे हिमालयाची पर्वतरांग काळी दिसत आहे. पिथौरागढ जिल्ह्यातील गुंजी येथे जिथे या वेळी किमान दोन फूट बर्फ असायला हवा होता, तिथे धूळ उडत आहे. स्थानिक लोक हवामानाच्या या उदासीनतेमुळे आश्चर्यचकित झाले आहेत, कारण त्यांनी यापूर्वी अशी परिस्थिती कधीही पाहिली नव्हती.

हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पाऊस आणि बर्फवृष्टी न होण्याचे कारण पश्चिमी विक्षोभ (वेस्टर्न डिस्टर्बन्स) निष्क्रिय होणे हे आहे. पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाल्यानंतरच पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता आहे. तथापि, काही दिवस हीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. हिमालयातील बर्फवृष्टीची कमतरता केवळ पर्यावरणासाठी धोकादायक नाही, तर स्थानिक लोकांच्या जीवनमानावर आणि अर्थव्यवस्थेवरही नकारात्मक परिणाम करू शकते.

ओम् पर्वत उघडा पडला
ओम पर्वत हिंदूंच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे. कैलाश मानसरोवर, आदि कैलासला येणारे भाविक ओम पर्वताला नक्की पाहतात. ओम पर्वताची उंची ५,९०० मीटर आहे. यावेळी या पर्वतावर चार फुटांपेक्षा जास्त बर्फ असायला हवा होता, पण या शिखरावर नाममात्र बर्फ आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला" आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
00:22
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला"आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
01:07
Video thumbnail
Nanded News | पाकिस्तानी क्रीममध्ये 48 हजार पट पारा! फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक निष्कर्ष
03:02
Video thumbnail
Nanded|शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
05:43
Video thumbnail
Solapur Well Collapse: आंबे गावात विहीर खचली; चार जण मातीखाली अडकले, बचावकार्य सुरू
01:16
Video thumbnail
Latur Accident News: टाका पाटीजवळ भीषण अपघात; दोघांचा दुर्दैवी मृत्यू
00:41
Video thumbnail
Latur Bank Election : लातूरचा मतदार सन्मान गहाण ठेवणारा नाही – आमदार अमित देशमुख यांचे मोठे वक्तव्य
05:40
Video thumbnail
Latur District Bank Election: योग्य उमेदवाराला मतदान करा – दिलीपराव देशमुखांचे आवाहन
01:10
Video thumbnail
Nanded News: आंतरपिकात गांजाची लागवड; 9 लाख 24 हजारांचा गांजा जप्त, किनवटमध्ये LCB ची कारवाई
00:43
Video thumbnail
Latur District Bank Election: धमक्या, द्वेषाशिवाय विरोधकांनी काही केलं नाही – धीरज देशमुखांचा प्रहार
04:38
Video thumbnail
Latur District Bank Election 2026: जिल्हा बँकेची सत्ता कुणाची?
11:10
Video thumbnail
Latur District Bank Election: उद्या मतदान, ३० उमेदवार आणि ९९९ मतदार
03:17
Video thumbnail
Latur Blood Shortage: लातूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा; AB Positive रक्तगटाची सर्वाधिक टंचाई
03:28
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलच्या विजयाचा धीरज देशमुखांना विश्वास
06:14
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलला साथ द्या – ॲड. उदय गवारे यांचे आवाहन
02:59

Latest news